नवी दिल्ली : भारत २०४७ विकसित भारत ही यंदाच्या ७८ व्या स्वातत्र्यदिनाची संकल्पना आहे. पण हा विकसित भारत आणि समृद्ध भारत कसा होईल? आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? याचं व्हिजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनी देशाला लाल किल्ल्यावरुन संबोधित करताना मांडलं.