नवी दिल्ली: देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी धर्मनिरपेक्ष नागरी संहितेसह अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा वन नेशन, वन इलेक्शनच्या गरजेवर भर दिला. या दिशेने सर्वांनी काम करायला हवे, असे ते म्हणाले.