नवी दिल्ली: देश आज 78वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान मोदींनी आज 11व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सर्वसामान्यांचे संदेश वाचून दाखवले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात विकसित भारताचा संकल्प, भाजप सरकारचे काम आणि इतर गोष्टींबद्दल भाष्य केले आहे. तर दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचे महत्त्व पटवून देत त्यांनी महिलांवरील अत्याचारांबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच महिला सुरक्षेसाठी राज्यांना आवाहनही मोदींनी आजच्या भाषणात केले आहे.