Independence Day: भ्रष्टाचार करून देश लुटून पळून गेलेल्यांना परत आणणार - PM मोदी

भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली
PM Modi
PM Modi esakal
Updated on

भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 7.30 वाजता लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केलं. त्यांनंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित केलं. मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं की, भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीयांनी राष्ट्रध्वज फडकवत देशाचा मान उंचावली आहे. जगभरात भारताचा राष्ट्रध्वज अभिमानानं फडकत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात पसरलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मोदींनी भ्रष्टाचाराच्या विरोधात मत व्यक्त केलं आहे.

मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना म्हटलं आहे की, एखाद्याकडे राहायला जागाही नाही, तर एखाद्याकडे चोरीचा माल ठेवायला जागा नाही, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच गेल्या आठ वर्षांत, आम्ही थेट लाभ हस्तांतरण करून दोन लाख कोटी रुपयांची बचत केली आहे. आधी हा पैसा चुकीच्या हातात जायचा. पूर्वीच्या सरकारांमध्ये बँका लुटून पळून गेलेल्यांच्या मालमत्ताही जप्त केल्या जात आहेत. जे भारतातून पळून गेलेत त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही एका गंभीर पाऊलं उचलत आहोत, असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.

PM Modi
Independence Day: सोनिया गांधीचा पंतप्रधानांवर हल्लाबोल; "स्वातंत्र्यसैनिकांच्या महान बलिदानाला.."

पुढे पंतप्रधानांनी भाषणात म्हटलं की, 'देशाचा हा 75 वर्षांचा प्रवास चढउतारांनी भरलेला आहे. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने भारतीयांच्या भावना दुखावल्या होत्या. त्या परिस्थितीतही भारतीय लढले. स्वातंत्र्यानंतर देश फुटेल आणि लोक आपापसात लढतील, अशी भारताची खिल्ली उडवली गेली होती. पण भारताच्या मातीत अनन्यसाधारण शक्ती आहे, हे भारतानं वेळोवेळी सिद्ध केलं आहे.'

PM Modi
'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', PM मोदींचा नवा नारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()