'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', PM मोदींचा नवा नारा

आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत.
pm modi new slogan
pm modi new sloganesakal
Updated on

'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', असा नवा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिनी दिला. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केलं. यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुताम्यांना अभिवादन करत पंतप्रधानांनी देशवासीयांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.(Independence day pm modi new slogan jai jawan jawan kisan jai vigyan jai ansandha)

pm modi new slogan
Guard Of Honour: पंतप्रधान मोदींना लष्कराने दिलेला 'गार्ड ऑफ ऑनर' म्हणजे काय?

पंतप्रधान मोदी यांनी 'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान'ची घोषणा केली आहे. लाल बहादूर शास्त्रींनी 'जय जवान, जय किसान'चा नारा दिला. यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी त्यात 'जय विज्ञान' जोडले. आणि आता त्यात 'जय अनुसंधान' जोडण्याची वेळ आली आहे. आता 'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', असा नारा पंतप्रधानांनी दिला आहे.

देशाला संबोधित करताना मोदी यांनी भारतीयांना पाच संकल्प दिले. येत्या काळात आपण 'पंचप्राण' वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं मोदी म्हणाले. पहिले - विकसित भारताचे मोठे संकल्प आणि संकल्प घेऊन पुढे जा; दुसरे - गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका; तिसरे - आपल्या वारशाचा अभिमान बाळगा; चौथे - एकतेचे सामर्थ्य आणि पाचवे - नागरिकांची कर्तव्ये ज्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

pm modi new slogan
Independence Day: राज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

आपल्याला नव्या आत्मनिर्भर भारताचा संकल्प करायचा आहे. स्वत: सह भारतालाही आत्मनिर्भर बनवायचं आहे. यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करायचं आहे. विविधतेतील एकता संपूर्ण जगाला दाखवायची आहे, असं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()