Independence day : अशी करा स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाची तयारी

या स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून सर्व शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते.
Independence day
Independence daygoogle
Updated on

मुंबई : भारत १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल. हा तोच ऐतिहासिक दिवस आहे जेव्हा भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. या दिवशी आपण सर्व स्वातंत्र्यवीरांना स्मरण करतो ज्यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले.

या स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून सर्व शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते. या दिवशी अनेक शाळा विद्यार्थ्यांसाठी निबंध किंवा भाषण स्पर्धा आयोजित करतात. यावेळीही ही स्पर्धा १५ ऑगस्ट रोजी होणार आहे. आपण भाषण स्पर्धेत सहज यश कसे मिळवू शकता ते जाणून घेऊ या.

Independence day
Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' मोहीम काय आहे ? यात कसे सहभागी व्हाल ?

सभेला उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळींना, आदरणीय मुख्याध्यापक महोदय आणि माझे प्रिय शिक्षक, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या या पवित्र सणाच्या निमित्ताने आज मी माझे विचार तुम्हा सर्वांसमोर मांडण्यासाठी आलो आहे.

आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सर्व लढवय्यांना आम्ही सलाम करतो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे.

Independence day
Flag Code of India : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकवताना हे नियम पाळा

स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. या दिवशी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशातील जनतेचे अभिवादन स्वीकारतात आणि ध्वजारोहण करतात.

यानंतर पंतप्रधान देशाला संबोधित करतात आणि भाषण देतात. भाषण ऐकण्यासाठी लोक लाल किल्ल्यावर गर्दी करतात. तसेच पंतप्रधान लष्कराच्या जवानांना सलामी देतात. लष्करातर्फे यावेळी बॅण्ड आयोजित केला जातो.

मित्रांनो, आपण सर्व मिळून तिरंग्याला नतमस्तक होऊन स्वातंत्र्याचा हा सण साजरा करूया आणि सर्व सेनानींच्या बलिदानाचे स्मरण करूया. शेवटी, मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद! जय भारत! जय हिंद!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.