भारतातील लसीकरण एक अब्जच्या दिशेने; गाठला 85 कोटींचा टप्पा

भारतातील लसीकरण एक अब्जच्या दिशेने; गाठला 85 कोटींचा टप्पा
Updated on

नवी दिल्ली : भारतात गेल्या 16 जानेवारीपासून लसीकरणाची मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर भारताने जराही मागे वळून न पाहता अविरतपणे ही मोहिम सुरु ठेवली आहे. सुरुवातीला कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींसह सुरु करण्यात आलेल्या या लसीकरणाच्या कार्यक्रमाने आता मोठा टप्पा गाठला आहे. दिवसेंदिवस लसीकरणाची गती वाढत असून अधिकाधिक लोकांचे लसीकरण पार पाडले जात आहे. याच लसीकरण मोहिमेने आता तब्बल 85 कोटींचा टप्पा आज गाठला आहे.

भारतातील लसीकरण एक अब्जच्या दिशेने; गाठला 85 कोटींचा टप्पा
२६/११च्या सूत्रधारांवर व्हावी कारवाई; मोदी-बायडेन भेटीनंतर संयुक्त निवेदन

जगातील सर्वांत मोठ्या लसीकरण अभियानाने 85 कोटींचा टप्पा पार केला आहे. लवकरच येत्या ऑक्टोबर महिन्याच्या मध्यामधीच्या आधीच भारत एक अब्ज लसीकरणाचा टप्पा गाठू शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 17 सप्टेंबर म्हणजेच मोदींच्या वाढदिनी लसीकरण मोहिमेने एका दिवसांत विक्रमी उच्चांक गाठला होता. एका दिवसांत तब्बल अडीच कोटींहून अधिक भारतीयांचे लसीकरण या दिवशी पार पाडण्यात आलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()