INDIA Aghadi : काँग्रेसला विधानसभा निवडणुकांमध्ये रस नितीशकुमार यांचा टोमणा; ‘इंडिया’तील वाद पुन्हा चव्हाट्यावर

या सभेमध्ये बोलताना नितीशकुमार हे हसत हसत म्हणाले, ‘‘ आमची त्यांच्याशी बोलणी सुरू
nitish kumar
nitish kumarsakal
Updated on

पाटणा - केंद्रातील सत्ताधारी भाजपला टक्कर देण्यासाठी स्थापन झालेल्या विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागले असून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज उघडपणे काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली. आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसच्या बाजूने कोणतीच तयारी होताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस हा ‘इंडिया’ आघाडातील सर्वांत मोठा सदस्य असून त्याने नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये असायला हवे पण तोच पक्ष आता विधानसभा निवडणुकांमध्ये अडकून पडला असल्याची नाराजी नितीश यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. ते पाटण्यामध्ये आयोजित ‘भारतीय कम्युनिस्ट पक्षा’च्या मेळाव्यामध्ये बोलत होते.

या सभेमध्ये बोलताना नितीशकुमार हे हसत हसत म्हणाले, ‘‘ आमची त्यांच्याशी बोलणी सुरू असून आम्ही त्यांना ‘इंडिया’ आघाडीमध्ये ढकलू पाहात आहोत पण त्याआघाडीवर फारशी प्रगती झालेली दिसत नाही. सध्या काँग्रेसला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येच फार रस आहे. ‘इंडिया’ आघाडीमध्ये काँग्रेसकडे आम्ही मोठ्या भावाचा भूमिका देऊ केली आहे पण आता या पाच राज्यांतील विधानसभेची निवडणूक झाल्यानंतरच ते पुढील बैठकीचे आयोजन करतील असे दिसते.’’

या आघाडीची मागील बैठक ही मुंबईमध्ये पार पडली होती. यानंतर पुढील बैठकीची तारीख काँग्रेस पक्ष निश्चित करेल असे ठरले होते. यासाठी दिल्लीमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा होणे अपेक्षित होते पण काँग्रेस पक्षाकडून याबाबत अधिकृतपणे चकार शब्दही काढण्यात आला नसल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. ‘इंडिया’ आघाडीची पुढील बैठक ही मध्यप्रदेशमध्ये होईल, अशी शक्यता केली जात होती पण त्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही.

nitish kumar
India Aghadi : लोकसभेच्या जागावाटपाबाबत ‘इंडिया’ची कसोटी

समविचारी नेत्यांची मोट बांधली

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या स्थापनेसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला होता. भाजपविरोधातील समविचारी नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्यामध्येही त्यांचा मोठा वाटा होता. अनेक पक्षांचे काँग्रेससोबत असलेले वादही त्यांनी मिटविले होते. मे महिन्यामध्ये त्यांनी या अनुषंगाने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी बोलणी करून त्यांच्या काँग्रेस पक्षासोबत असलेल्या वादाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला होता.

वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी

‘इंडिया’ आघाडीची पहिली बैठक ही जून महिन्यामध्ये पाटण्यात झाली होती. तेव्हा आम आदमी पक्षाने काँग्रेसचा निषेध म्हणून तिच्यावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली होती. तेव्हाही नितीशकुमार यांनी मध्यस्थी करताना हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. आताही ‘इंडिया’ आघाडीमध्ये मध्यप्रदेशातील जागावाटपावरून वादाची ठिणगी पडली असून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

nitish kumar
India Aghadi : पंतप्रधानांना बोलायला भाग पाडा

डाव्या पक्षांनी एक व्हावे

डाव्या पक्षांसोबत असलेल्या आपल्या संबंधांना देखील नितीशकुमार यांनी यावेळी उजाळा दिला. ‘‘ मी १९८० मध्ये पहिली निवडणूक जिंकली होती तेव्हा मला भाकप आणि माकप अशा दोन्ही पक्षांनी मदत केली होती. डावा विचार ही एक प्रगतिशील विचारधारा असून या पक्षांच्या सभेला मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहतात.सगळ्या डाव्या पक्षांचे मूळ एकच आहे त्यामुळे सर्वांनी पुन्हा एक यायचा विचार करायला हवा,’’ असेही नितीश यांनी सांगितले.

nitish kumar
Mahavikas Aghadi: निवडणुकांमध्ये आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज व्हा : ॲड. रवींद्र पगार

‘यूपी’त ‘सप’ ८५ जागा लढणार

‘इंडिया’ आघाडीचा महत्त्वाचा घटक असलेल्या समाजवादी पक्षाने आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी दंड थोपटले असून उत्तरप्रदेशात आमचा पक्ष लोकसभेच्या ८५ जागा लढेन, असा दावा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. काही महत्त्वाच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून उर्वरित पंधरा जागांच्या वाटपाबाबत काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीतील इतर घटक पक्षांसोबत चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.