लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान इंडिया आघाडीच्या वतीने दिल्लीत महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी इंडिय आघाडीच्या पाच मोठ्या मागण्या जाहीर केल्या.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, इंडिया आघाडीची पहिली मागणी आहे की निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत सर्वांना समान संधी मिळतील यांची काळजी घेतली पाहिजे. दुसरी मागणी आहे की, निवडणूक आयोगाने निवडणुकांमध्ये फेरफार करण्याच्या उद्देशाने विरोधी पक्षांच्याविरोधात आयटी, ईडी आणि सीबीआयकडून होणारी कारवाई शक्तीचा वापर करून थांबवली पाहिजे.
तसेच इंडिया आघाडीची तिसरी मागणी ही , हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांची तात्काळ सुटका करण्यात यावी अशी आहे. तर चौथी मागणी ही निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षांचा आर्थिक नाकेबंदी करून गळा आवळण्याची कारवाई बंद केली जावी अशी आहे. पाचवी मागणी ही निवडणूक रोख्यांचा वापर करून भाजपकडून सूड उगवण्याचे प्रकार, जबरदस्तीने वसूलीच्या आरोपांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एक एसआयटी स्थापन केली जावी.
दरम्यान यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रॅलीला संबोधित करताना भाजपवर लोकसभा निवडणूकीत मॅच फिक्सिंगचा आरोप लावला. सध्या आयपीएल सुरू आहे. यामध्ये बेईमानी करून खेळाडू विकत घेऊन, दबाव टाकून सामने जिंकले जातात त्याला मॅच फिक्सिंग म्हणातात. आज निवडणुकीत देखील हेच होत आहे. अंपायर त्यांचा आहे आणि आमचे दोन खेळाडू सामन्यापूर्वी जेलमध्ये टाकण्यात आलेत असेही राहूल गांधी म्हणाले.
तसेच राहुल गांधी यांनी हे ४०० जागा जिंकणार असल्याचा दावा करत आहेत मात्र हे १८० च्या वर जाणार नाहीत. देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाची खाती बंद करण्यात आली आहेत. पोस्टर लावायचे आहेत पण पैसे नाहीयेत, नेत्यांना तुरूंगात टाकले जात आहे. ही मॅच फिक्सिंग आहे. के काम नरेंद्र मोदी आणि काही उद्योगपती करत आहेत असेही राहुल गांधी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.