विरोधी पक्षाची आघाडी 'इंडिया'च्या समन्वय समितीची आज (बुधवार) निवडणुक रणनिती, प्रचार आणि रॅलींना अंतिम स्वरूप देण्यासाठी बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी होणाऱ्या या बैठकीत रणनितीला अंतिम स्वरूप दिलं जाईल. यासोबतच जागा वाटपावर देखील चर्चा होऊ शकते.
इंडिया आघाडी समन्वय समितीची ही बैठक महत्वाची आहे कारण यापूर्वी वेगवेगळ्या घटत पक्षांची बैठक झाली आहे. सोशल मीडिया समिती आणि अभियान समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेवर समन्वय समिती चर्चा करेल आणि त्यावर अंतिम निर्णय घेईल. यासोबतच सामूहिक कार्यक्रम आयोजनाची रुपरेखा देखील यावेळी तयार केली जाईल. या बैठकीत जागा वाटपावर देखील चर्चा केली जाईल. आघाडीतील एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार मागील कामगिरीच्या आधारावर राज्यांमध्ये जागा वाटपावर चर्चा होऊ शकते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक राज्यात घटक पक्षांमध्ये जागा वाटपाबाबद कुठलीही अडचण येणार नाही.
तसेच अनेक राज्यात इंडिया आघाडीच्या घटक पक्षांमध्ये आपापसात लढत होण्याची शक्यता आहे. यादरम्यान समन्वय समिती हस्तक्षेप करू शकते. यासोबत समिती आघाडीच्या पहिल्या सामूहिक रॅलीची तारीख आणि ठिकाण निश्चित करू शकते. प्रचार समितीने पटणा, भोपाळ, गुवाहाटी, नागपूर साठी प्रस्ताव दिला आहे.
यादरम्यान समन्वय समितीच्या या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या वतीन कोणताही नेता उपस्थित न राहण्याची शक्यता आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी ट्वीट करत समन्वय समितीच्या पहिली बैठक १३ सप्टेंबर दिल्ली येथे होत आहे. पण ईडीने समन्स जारी केल्याने याच दिवशी मला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे असे म्हटले आहे. तसेच जदयू चे ललन सिंग हे देखील आजारी असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत.
कोण कोण असणार?
समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे केसी वेणुगोपाल, डीएमके चे टीआर बालू, झामुमो चे हेमंत सोरेन, शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे संजय राऊत, राजदचे तेजस्वी यादव, आपचे राघव चड्ढा. सपाचे जावेद अली खान, जदयू चे ललन सिंह, भाकपाचे डी राजा, एनसीचे उमर उब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती आणि माकपा यांचा समावेश असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.