नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या समन्वय समिती पहिली बैठक आज दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत जागा वाटपांबाबतच्या फॉर्म्युल्यावर विशेष चर्चा झाली. यात नेमकं काय ठरलं? याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. (INDIA alliance Coordination Committee meeting discussion on seats sharing Omar Abdullah gives details)
"ज्या जागा इंडिया आघाडीतील सदस्य पक्षांकेड आधीच आहेत त्या चर्चेसाठी खुल्या नसाव्यात. तर आपण केवळ भाजप, एनडीए किंवा यांपैकी कोणत्याही युतीचा भाग नसलेल्या पक्षांकडे ज्या जागा आहेत त्या जागांवरच चर्चा केली पाहिजे" अशी साधक बाधक चर्चा आजच्या बैठकीत झाली, असं अब्दुल्ला यांनी सांगितलं. (Latest Marathi News)
इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा भोपाळमध्ये होणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. या सभेत महागाई, बेरोजगारी आणि भाजपशासित राज्यातील भ्रष्टाचार हा अजेंडा असणार आहे. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. (Marathi Tajya Batmya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.