इंडियाच्या बैठकीत भारतमातेच्या फोटोसमोर अशोक स्तंभ अन् संविधान; सर्व पक्षांच्या विचारधारांसोबत जाण्याचा प्रयत्न

एएनआयने एक व्हिडीओ शेअर केला ज्यात विरोधकांच्या बैठकीच्या ठिकाणी 'भारतीय संविधान, अशोक स्तंभ आणि त्यापाठीमागे भारत मातेचा फोटो लावण्यात आला आहे.
इंडियाच्या बैठकीत भारतमातेच्या फोटोसमोर अशोक स्तंभ अन् संविधान; सर्व पक्षांच्या विचारधारांसोबत जाण्याचा प्रयत्न
Updated on

INDIA Alliance:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारला राजकारणाच्या मैदानात धोबीपछाड देण्यासाठी विरोधकांनी युतीला 'इंडिया' नाव दिलं. सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी अविश्वास प्रस्तावही आणला गेला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधकांध्ये राजकीय रणधुमाळी सुरु झाली. विरोधकांनी देशभरात स्थानिक पक्षांना एकत्र घेण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या इंडिया आघाडीने वेगवेगळ्या राज्यात बैठका घ्यायला सुरुवात केली.

आघाडीचा समन्वयक नेमण्यासाठी आणि लोगो ठरवण्यासाठी मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक झाली. १ सप्टेंबरला विरोधकांकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्याआधी एएनआयने एक व्हिडीओ शेअर केला ज्यात विरोधकांच्या बैठकीच्या ठिकाणी 'भारतीय संविधान, अशोक स्तंभ आणि त्यापाठीमागे भारत मातेचा फोटो लावण्यात आला आहे.

पहिल्या दिवशीची  बैठक पार पडल्यावर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ताशेरे ओढत गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी उद्योजक गौतम अदानींचाही उल्लेख केला. यावेळी त्यांनी फायनान्शिअल एक्स्प्रेस, द गार्डियन या वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्यांचा दाखला देत, मोदी-अदानी संबंधावर संशय व्यक्त केला. राहुल गांधींनी अदानींच्या कुटुंबावर चुकीच्या पद्धतीने शेअरची किंमत वाढवल्याचा आरोप केला. (Latest Marathi News)

राहुल गांधींनी यावेळी सरकारी यंत्रणांवरही टीकास्त्र डागले. गौतम अदानींच्या गैरव्यवहाराची चौकशी ज्या सेबीच्या अधिकाऱ्याने केली आणि नंतर अदानींना क्लिन चीट दिली. त्या अधिकाऱ्याला अदानींच्या कंपनीत नोकरी कशी मिळाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

इंडियाच्या बैठकीत भारतमातेच्या फोटोसमोर अशोक स्तंभ अन् संविधान; सर्व पक्षांच्या विचारधारांसोबत जाण्याचा प्रयत्न
Eknath Shinde:विरोधकांच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया! म्हणाले, "२०१४ मध्ये ज्यांनी राहुल गांधीचा विरोध केला..."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.