INDIA Meeting : '...मोदींना चंद्रावर नाही, तर सूर्यावर पाठवा'; लालू प्रसाद यादवांचा टोला

Lalu Prasad Yadav : यावेळी बोलताना लालूंनी पंतप्रधान मोदींना मोठं आव्हान दिलं आहे.
INDIA Meeting Lalu Yadav
INDIA Meeting Lalu YadaveSakal
Updated on

INDIA Alliance Meeting News : इंडिया आघाडीची मुंबईतील दोन दिवसीय बैठक आज संपन्न झाली. यानंतर पत्रकार परिषदेमध्ये या आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांनी आपली मतं व्यक्त केली. यामध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनीही भाषण केलं. यावेळी त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांना एक आवाहन देखील केलं.

यादव यांनी बोलताना चांद्रयान-3 मोहिमेच्या यशासाठी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. "या वैज्ञानिकांचा देशभरात गौरव होत आहे. व्हायलाही हवा. मला कोणीतरी म्हणालं, की आम्ही इस्रोच्या वैज्ञानिकांना एक आवाहन करत आहे. त्यांनी मोदींना मागे न ठेवता, चंद्रावरच नव्हे तर सूर्यावरही पोहोचवलं पाहिजे." असं यादव म्हणाले.

INDIA Meeting Lalu Yadav
INDIA Alliance Meeting Mumbai : इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वाचे 4 ठराव; आघाडीच्या एकसंधतेसाठी...

ते पुढे म्हणाले, "यानंतर मोदींचं जगभरात नाव होईल. अमेरिका वगैरे सर्व देश आपल्या मागे पडतील. राहुल गांधी कित्येक देशांमध्ये फिरत असतात. तेदेखील पाहतील की मोदीजी कशा प्रकारे अमेरिकेत आणि जगभरात भारताचं नाव मोठं करत आहेत."

दसऱ्यानंतर शुभ मुहूर्त

लालू प्रसाद यादव यापुढे म्हणाले, की दसऱ्यानंतर यासाठी चांगला मुहूर्त आहे. त्यामुळे वैज्ञानिकांनी तयारी करुन घ्यावी. आमच्या त्यांना या प्रवासासाठी शुभेच्छा आहेत.

INDIA Meeting Lalu Yadav
INDIA Alliance Meeting Mumbai : ''अटकेची तयारी ठेवा'' इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

यावेळी लालू प्रसाद यादव यांनी भ्रष्टाचार, महागाई आणि काळं धन या सर्व गोष्टींवरून मोदींवर चौफेर फटकेबाजी केली. तसंच, पंतप्रधान मोदी पुन्हा निवडून येणार नाहीत याची आम्ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून काळजी घेऊ; असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांना आव्हान दिलं.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.