INDIA Alliance : ''कोण खर्गे-फर्गे ओळखत नाही, नितीश कुमारच पंतप्रधान होणार'' आमदाराचं वादग्रस्त विधान

नवी दिल्लीतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे आलेलं होतं.
INDIA Alliance
INDIA Allianceesakal
Updated on

भागलपूरः नवी दिल्लीतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे आलेलं होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा मुद्दा ठेवला होता. त्यांच्या मुद्द्याचं समर्थन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेलं.

ममता बॅनर्जी यांच्या विधानानंतर नितीश कुमार यांचं नाव मागे पडत असल्याचं बोलले जातंय. त्यावरुनच जेडीयू नेते संताप व्यक्त करीत आहेत. आमदार गोपाल मंडल यांनी वादग्रस्त विधान करुन इंडिया आघाडीतील वाद चव्हाट्यावर आणला आहे.

INDIA Alliance
Israel–Hamas war : इस्राईल-हमास युद्धात गाझातील 'एवढे' लोक मृत्यूमुखी; आरोग्य मंत्रालयाकडून अधिकृत आकडेवारी

गोपाल मंडल म्हणाले की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी बनवण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित केलं होतं. त्यांच्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या. आता मात्र पंतप्रधान पदावरुन मुद्दे उपस्थित केले जात आहेत, ते चुकीचं आहे.

''नितीश कुमार यांना केवळ बिहारमध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये लोक ओळखतात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना कोण ओळखतं. खर्गे-फर्गे यांना कोणी ओळखत नाही. आम्हीही ओळखत नव्हतो.''

गोपाल मंडल पत्रकाराला म्हणाले की, तुम्ही नाव घेतल्यानंतर आम्हाला कळलं की ते काँग्रेस अध्यक्ष आहेत. त्यांना कोण ओळखतं? दुसरीकडे नितीश कुमारांना सामान्य जनता ओळखते. मुळात काँग्रेसला महागाईमुळे लोकांनी हटवलं होतं. त्यामुळे पुन्हा काँग्रेसला सत्ता देण्याचा प्रश्नच नाही.

INDIA Alliance
Sharad Pawar-Rahul Gandhi Meeting: शरद पवार व राहुल गांधी यांच्यात काय चर्चा झाली? जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात?

गोपाल मंडल यांच्या विधानानंतर काँग्रेस आमदार अजित शर्मा यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, एकीकडे इंडिया आघाडी सगळ्या पक्षांसोबत एकजुटीची भाषा करत आहे, त्यातच दुसरीकडे एका आमदाराकडून असं विधान होणं चुकीचं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या आमदारावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी शर्मांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.