INDIA Meeting: घटक पक्षांतील नाराजीच्या चर्चांमध्ये इंडिया आघाडीची बैठक पुढे ढकलली; नवी तारीख आली समोर

इंडिया आघाडीतील अनेक घटक पक्षांमध्ये सध्या नाराजी असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
INDIA Alliance Mumbai Meeting
INDIA Alliance Mumbai Meeting esaka
Updated on

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचं तीन राज्यांमध्ये पानीपत झालं. यानंतर लगेचच या आघाडीची बैठक ६ डिसेंबर रोजी दिल्लीत पार पडणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली होती.

पण या बैठकीची माहिती आम्हाला नसल्याचं तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, जदयूचे प्रमुख नितीश कुमार यांनी म्हटलं होतं. त्यामुळं इडिया आघाडीत कुरबुरी सुरु झाल्याची चर्चा कालपासून सुरु झाली. अशातच आता इंडिया आघाडीच्या बैठकीची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. (INDIA alliance meeting postpone new date has been decided as 17 December 2023)

INDIA Alliance Mumbai Meeting
Natya Sammelan: कोरोनामुळं रखडलेल्या शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाचं अखेर बिगुल वाजलं! 5 जानेवारीपासून नांदीला सुरुवात

6 डिसेंबरला होणार होती बैठक

राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनी मंगळवारी इंडिया आघाडीच्या या बैठकीबाबत महत्वाची घोषणा केली. ही बैठक आधी ६ डिसेंबर रोजी होणार होती पण या दिवशी आघाडीतील अनेक घटक पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीला हजर राहू शकणार नसल्याचं म्हटल्यानं ही बैठक पुढे ढकलण्यात आली. (Latest Marathi News)

त्यामुळं आता इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांची चौथी बैठक दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी १७ डिसेंबर रोजी होणार आहे.

INDIA Alliance Mumbai Meeting
Revanth Reddy: मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा झाल्यानंतर रेवंथ रेड्डींनी केलं ट्विट; म्हणाले, आमच्या सैनिकांनी...

नेते येऊ शकणार नव्हते

यापूर्वी ६ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीला ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, नितीश कुमार, हेमंत सोरेन यांनी येण्यास नकार दिला होता. नितीश कुमार यांच्यावतीनं जदयूकडून लल्लन सिंह आणि संजय झा तर अखिलेश यांच्यावतीनं सपाकडून रामगोपाल यादव हे या बैठकीला हजेरी लावतील असं सांगितलं जात होतं. (Marathi Tajya Batmya)

INDIA Alliance Mumbai Meeting
Senthil Kumar: "भाजप फक्त 'गौ मुत्र' राज्यांमध्येच जिंकतो"; DMK खासदाराच्या विधानामुळं नवा वाद

१७ डिसेंबरला होणार बैठक

तर दुसरीकडं तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एमके स्टॅलिन हे देखील या बैठकीला हजर राहू शकणार नव्हते. कारण तामिळनाडूत सध्या मिचाँग चक्रीवादळानं थैमान घातलं आहे. चेन्नईतील विमानतळही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळं इथली विमान, रेल्वे ठप्प झाली आहे. तर नितीश कुमार यांची प्रकृती ठीक नाहीए. तर ममता बॅनर्जींचे ६ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रम आहेत. त्यामुळं या दिवशी होणारी बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.