INDIA Alliance : ''तुम तो धोकेबाज हो...'' रामलीला मैदानाच्या मंचावरुन तेजस्वी यादवांनी सूर धरला

दिल्लीमध्ये आयोजित सभेत भाषणाच्या शेवटी तेजस्वी यादव यांनी बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांची आठवण काढली आणि त्यांच्या सिनेमातील एक गाणं गायलं. मंचावर उपस्थित इंडिया आघाडीच्या नेत्यांसमोर त्यांनी गाणं गायल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
INDIA Alliance : ''तुम तो धोकेबाज हो...'' रामलीला मैदानाच्या मंचावरुन तेजस्वी यादवांनी सूर धरला
Updated on

नवी दिल्लीः दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या वतीने रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या रॅलीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी मंचावरुन मुख्यमंत्री केजरीवाल यांचा मेसेज वाचून दाखवला. त्यानंतर मंचावर झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी आपलं म्हणणं मांडलं.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी त्यानंतर मंचावरुन संबोधन केलं. तेजस्वी यादवांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान चक्क गीत गायलं.

INDIA Alliance : ''तुम तो धोकेबाज हो...'' रामलीला मैदानाच्या मंचावरुन तेजस्वी यादवांनी सूर धरला
Viral Video: आरारारा खतरनाक! कार गरागरा फिरली अन् ड्रायव्हर थेट आकाशात; रोहित शेट्टीचा चित्रपटही ठरेल फेल

भाषणाच्या शेवटी तेजस्वी यादव यांनी बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांची आठवण काढली आणि त्यांच्या सिनेमातील एक गाणं गायलं. मंचावर उपस्थित इंडिया आघाडीच्या नेत्यांसमोर त्यांनी गाणं गायल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

तेजस्वी यादव यांनी गाणं म्हटलं-

तुम तो मोदीजी धोकेबाज हो.. वादा कर के भूल जाते हो...

रोज-रोज मोदी जी तुम जो ऐसा करोगे..

जनता जो रुठ गई तो हाथ मलोगे

हे गाणं तेजस्वी यांनी गायलं. उपस्थितांनी टाळ्यांची दाद देऊन तेजस्वी यादवांना साद दिली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीकडून या महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

INDIA Alliance : ''तुम तो धोकेबाज हो...'' रामलीला मैदानाच्या मंचावरुन तेजस्वी यादवांनी सूर धरला
Viral Video : 'अरे मंगळावरून आलाय काय?' उबर ऑटोचं भाडं ६२ रुपये, बिल साडेसात कोटी; Video होतोय व्हायरल

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकसभा निवडणुकीसाठी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. राहुल गांधी म्हणाले की, सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत. जेव्हा बेईमानीने अंपायरवर दबाव टाकून, खेळाडूंना विकत घेऊन किंवा कर्णधाराला घाबरवून मॅच जिंकल्या जातात तेव्हा क्रिकेटमध्ये याला मॅच फिक्सिंग म्हटले जाते. आपल्यासमोर लोकसभेच्या निवडणुका आहेत. अंपायर कोणी निवडले, नरेंद्र मोदी यांनी.. मॅच सुरू होण्यापूर्वीच आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करण्यात आली... त्यामुळे या निवडणुकीत नरेंद्र मोदी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()