Arms Export: भारताचा शस्त्र निर्यातीत 'पराक्रम', मागचे सर्व विक्रम मोडले, खास देशांच्या यादीत समावेश

India arms export increased : सोमवारी इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जारी केलेल्या माहितीनुसार, भारताने शस्त्र निर्मितीमध्ये मागील सर्व व्रिकम मोडले असून नवा विक्रम स्थापित केला आहे.
India arms
India arms
Updated on

नवी दिल्ली- भारत शस्त्र निर्मितीमध्ये मोठी प्रगती करत असताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताची शस्त्र निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला देखील याचा फायदा होत आहे. अशात सोमवारी इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जारी केलेल्या माहितीनुसार, भारताने शस्त्र निर्मितीमध्ये मागील सर्व व्रिकम मोडले असून नवा विक्रम स्थापित केला आहे.

भारताने यावर्षी २.५ अब्ज डॉलर किंमतीचे शस्त्र निर्यात केले आहेत. याचा अर्थ भारतीय शस्त्राच्या गुणवत्तेला जग स्वीकार करत आहेत. भारताने यावर्षी २.५ अब्ज डॉलरची शस्त्र निर्यात करून जगातील २५ देशांमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यामुळे ही अनेक अर्थाने महत्त्वाची गोष्ट आहे. भारतातील जवळपास १०० कंपन्या शस्त्र निर्मिती कामामध्ये गुंतल्या आहेत. या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.

India arms
Indian Army: २०२४ हे वर्ष भारतीय सैन्याकरता तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे वर्ष असेल, तत्कालीन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे असे का म्हणाले?

मोदी सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये शस्त्र निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. यासाठी सवलती आणि निधी देखील देण्यात आला आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. भारताची शस्त्र निर्मिती क्षमता चांगली वाढली आहे. भारताकडूनही आता शस्त्रांची निर्मिती होऊ लागली आहे. शिवाय अनेक नव्या कंपन्या या कामामध्ये उतरू पाहात आहेत.

भारत ड्रोनियर-२२८ एअर क्राफ्ट, आर्टिलरी गन्स, ब्रह्मोस सुपर सोनिक मिसाईल, क्रूज मिसाईल, पिनाका मल्टी रॉकेट लाँचर सिस्टम, रडार, सिमूलेटर्स आणि आर्म्ड व्हेईकल्स यांची निर्मिती करत आहे आणि निर्यात केली जात आहे. भारतीय शस्त्रांची मागणी जगभरात हळूहळू वाढू लागली आहे. यात मोठा टप्पा गाठण्याची अद्याप आवश्यकता असली तरी आपली प्रगती लक्षणीय आहे.

India arms
Transgender in Armed Forces: आर्मीमध्ये तृतीयपंथीयांची होणार भरती? समिती स्थापन, लवकरच होणार निर्णय

२०२२ मध्ये भारताने जवळपास १.७ अब्ज डॉलर शस्त्रांची निर्यात केली होती, त्यानंतर २०२३ मध्ये २ अब्ज डॉलरची निर्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारताने अद्याप शस्त्र खरेदी करणाऱ्या देशांनी नावे जाहीर केलेली नाहीत. मात्र, अर्मानिया आपल्याकडून सर्वात जास्त शस्त्र खरेदी करत आहे.

दरम्यान, भारत आज देखील सर्वात मोठा शस्त्र खरेदी करणारा देश आहे. गेल्या पाच वर्षात जगात विकले जाणाऱ्या एकूण शस्त्रांपैकी भारताने १० टक्के शस्त्र खरेदी केले आहेत. पण, आता भारताने निर्यात देखील वाढवली आहे. त्यामुळे हे चांगले संकेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.