देशाला १९४७ ला फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळालं - विश्व हिंदू परिषद

त्यांच्या या विधानामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
देशाला १९४७ ला फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळालं - विश्व हिंदू परिषद
Updated on

दिल्ली: भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं यावरून येणाऱ्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे सध्या देशात वाद सुरू आहे. अभिनेत्री कंगना रनौतने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता पुन्हा एक विधान समोर आलं आहे. विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) राष्ट्रीय सचिव सुरेंद्र जैन (Surendra Jain) यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १९४७ ला भारताला राजकीय दृष्ट्या स्वातंत्र्य मिळालं. आपल्याला धार्मिक आणि स्वातंत्र्य राम मंदीराच्या चळवळीतून मिळालं असं विधान जैन यांनी केलं आहे. सब के राम या पुस्तकाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी त्यांनी हे विधान केलं.

देशाला १९४७ ला फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळालं - विश्व हिंदू परिषद
'हिंदुत्वासाठी मैदान तयार करणारं काँग्रेस आता...'; ओवैसींची राहुल गांधींवर जोरदार टीका

राम मंदिरासाठी झालेल्या ४९० वर्षांच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं असून, राम मंदिर आंदोलनात 13 कोटी कुटुंब सहभागी झाले होते. 1984 ते 2019 पर्यंत 65 कोटी लोकांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी पाठिंबा दिला. 1947 मध्ये भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालं. पण राम मंदिराच्या आंदोलनातून आपल्याला आपलं धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळालं. धर्मनिरपेक्ष राजकारणानं देशाचं विभाजन केलं आहे असं मत जैन यांनी व्यक्त केलं आहे.

देशाला १९४७ ला फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळालं - विश्व हिंदू परिषद
लाल टोपीला घाबरल्याने उद्घाटनांचा धडका, जया बच्चन यांची मोदींवर टीका

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार म्हणाले, "राम मंदिर आंदोलनाने हिंदू समाजाला जागृत केले आणि हिंदूंसाठी आत्मसाक्षात्काराचा क्षण ठरला." या वक्तव्याचा अनेकांनी निषेध केला असून, यामुळे पुन्हा वाद उभा राहण्याची शक्यता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.