नवी दिल्ली : ब्रिक्स आणि जी ७ या परिषदांमध्ये भारताची भूमिका महत्वाची ठरते. भारत हा जागतीक मुत्सदेगीरीतील एक महत्वाचा खेळाडू बनला आहे. BRICSमध्ये भारताचा सहभाग असणं हे जागतिक राजकारणातील भारताचं विशेष स्थान अधोरेखित केलं आहे. कॅनडा वगळता G7 सारख्या मोठ्या पाश्चात्य देशांशी चांगले संबंध ठेवताना भारतानं चीन, रशिया आणि विकसनशील देशांशी आपले संबंध चांगल्या पद्धतीनं राखले आहेत. या सर्व गटांशी संवाद साधण्याची भारताकडं क्षमता आहे, त्यामुळं जागतिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं किंवा नवनिर्मितींमध्ये भारत हा आता जागतीक मध्यस्थ म्हणून आपलं स्थान बळकट करतो आहे.