कानपूर : आत्मनिर्भर भारतासाठी तुम्ही सर्वांनी अधीर व्हावे, असे सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना दिला आहे. (Narendra Modi) आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat ) हे संपूर्ण स्वातंत्र्याचे मूळ स्वरूप असून जिथे आपण कोणावरही अवलंबून राहणार नाही. भारत आज जगातील दुसरे सर्वात मोठे स्टार्ट-अप हब (Start up hub) म्हणून उदयास आले आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. कानपूर येथील आयोजित दीक्षांत समारंभात उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. (Modi Attends 54th Convocation Ceremony At IIT kanpur)
ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या या 75 व्या वर्षात आमच्याकडे 75 हून अधिक युनिकॉर्न, 50 हजारांहून अधिक स्टार्ट-अप आहेत. त्यापैकी 10 हजार गेल्या 6 महिन्यांतच आले आहेत. भारतीय कंपन्या जागतिक व्हाव्यात, भारताची उत्पादने जागतिक व्हावीत असे कोणाला वाटत नाही, असेही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्याला 25 वर्षे पूर्ण होत आहेत, तोपर्यंत आपणही आपल्या पायावर उभे राहण्यासाठी खूप काही करायला हवे होते. तेव्हापासून खूप उशीर झाला आहे, देशाचा बराच वेळ वाया गेला आहे. मधे दोन पिढ्या गेल्या, त्यामुळे दोन क्षणही गमावायचे नसल्याचे ते म्हणाले. (Narendra Modi)
आव्हानांपासून दूर पळू नका
प्रवासात अनेक लोक तुम्हाला सोयीसाठी शॉर्टकट सांगतील, असे पंतप्रधान म्हणाले. पण माझा सल्ला असा आहे की, तुम्ही कधीच आरामाची निवड करू नका, आव्हानं निवडा, कारण तुम्हाला हवे किंवा नको असले तरी जीवनात आव्हाने येणारच आहेत. त्यांच्यापासून दूर पळणारे त्यांचे बळी ठरतात असे मोदी यांनी यावेळी सांगितले.
आजचा काळ तंत्रज्ञानाचा
ते म्हणाले की, हे युग, हे 21 वे शतक पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित आहे. या दशकातही तंत्रज्ञान विविध क्षेत्रात आपला दबदबा वाढवणार आहे. तंत्रज्ञानाशिवाय जीवन आता एक प्रकारे अपूर्णच आहे. हे जीवन आणि तंत्रज्ञानाच्या स्पर्धेचे युग आहे आणि मला खात्री आहे की, तुम्ही यात नक्कीच पुढे याल. 1930 चा तो काळ, 20-25 वर्षांची तरुणाई, 1947 पर्यंतचा त्यांचा प्रवास आणि 1947 मधील स्वातंत्र्यप्राप्ती हा त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता, असे ते म्हणाले. आज तुम्हीही अशाच प्रकारे सुवर्ण युगात पाऊल टाकत आहात. हे जसे राष्ट्रजीवनाचे अमृत आहे, तसेच ते तुमच्या जीवनाचे अमृत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.