INDIA आघाडीत महत्वाच्या हालचाली! समन्वय समितीची पहिली बैठक 'या' दिवशी होणार

यासंदर्भात दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली.
INDIA आघाडीत महत्वाच्या हालचाली! समन्वय समितीची पहिली बैठक 'या' दिवशी होणार
Updated on

नवी दिल्ली : INDIA आघाडीच्या मुंबईतील बैठकीनंतर आता महत्वाच्या बाबी निश्चित करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार या आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक लवकरच पार पडणार आहे.

या बैठकीबाबत देशातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (INDIA Bloc first Coordination Committee meeting in Delhi on Sep 13)

बैठक कधी आणि कुठे होणार?

इंडियाच्या समन्वय समितीची पहिली बैठक १३ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता दिल्लीतील मिलाप बिल्डिंग इथं होणार आहे. गेल्या आठवड्यात आघाडीच्या प्रचार समितीत दोन नव्या सदस्यांचा समावेश करण्यात आला. त्यानुसार, १९ सदस्यांच्या या समितीत २१ सदस्य झाले आहेत. यामध्ये डीएमकेचे तिरुची शिवा आणि पीडीपीच्या मेहबुबा बेग यांचा समावेश करण्यात आला आहे. (Marathi Tajya Batmya)

INDIA आघाडीत महत्वाच्या हालचाली! समन्वय समितीची पहिली बैठक 'या' दिवशी होणार
Bacchu Kadu: 'सरकारने अंत पाहू नये, ....नाहीतर पुन्हा एकदा', बच्चू कडूंचा सरकारला इशारा

मुंबईतल्या बैठकीत मांडले तीन ठराव

दरम्यान, इंडिया आघाडीची शेवटची तिसरी मिटिंग मुंबईत पार पडली होती. यावेली तीन ठराव मांडण्यात आले. त्यानुसार, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती तसेच जागा वाटप लवकरात लवकर फायनल होईल, असं यावेळी सांगण्यात आलं. (Latest Marathi News)

विविध राज्यांमध्ये याबाबत तातडीनं कामाला सुरुवात होणार आहे. तसेच आघाडीतील विविध पक्षांच्यावतीनं देशभरात सार्वजनिक सभांचं आयोजन करण्यात येईल, याचीही लवकरच सुरुवात होईल असाही ठराव यावेळी करण्यात आला. (Marathi Tajya Batmya)

INDIA आघाडीत महत्वाच्या हालचाली! समन्वय समितीची पहिली बैठक 'या' दिवशी होणार
Weather Update: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय! विदर्भासह 'या' भागात ऑरेंज अलर्ट

तीन बैठका पडल्या पार

इंडिया आघाडीची पहिली बैठक २३ जून २०२३ रोजी बिहारच्या पाटणा इथं झाली होती. त्यानंतर दुसरी बैठक १७-१८ जुलै २०२३ रोजी कर्नाटकातील बंगळुरु इथं पार पडली तर ३१ जुलै - १ सप्टेंबर २०२३ या काळात महाराष्ट्रातील मुंबईत तिसरी बैठक पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.