INDIA Bloc Rally: भाजपसोबत तीन पक्ष... ED, CBI अन् Income Tax ; इंडिया आघाडीच्या मंचावरून उद्धव ठाकरेंची टीका

INDIA Bloc Rally: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची आज दिल्लीत सभा झाली. लोकतंत्र बचाव रॅली इंडिया आघाडीने काढली. यावेळी देशभरातील नेते दिल्लीत आले आहेत.
INDIA Bloc Rally
INDIA Bloc Rallyesakal
Updated on

INDIA Bloc Rally:  माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे आज (रविवार) दिल्लीत रामलीला मैदानावर आघाडीच्या 'भारत वाचवा लोकशाही रॅली'मध्ये सहभागी झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीला देश तुमच्या सोबत असल्याचे सांगितले.

ही निवडणूक रॅली नाही. दोन बहिणी हिंमतीने लढत आहेत तर भाऊ कसा मागे राहणार. कल्पना सोरेन आणि सुनीता सोरेन, काळजी करू नका, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. आपण हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहोत, अशी भीती होती, मात्र ही भीती नाही तर हे सत्य झाले आहे. आम्ही निवडणूक प्रचारासाठी आलो नाही. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरे पुढे म्हणाले, अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना अटक झाली तर ते घाबरतील, असे त्यांना वाटू शकते. आम्ही घाबरत नाही. त्यांनी देशवासीयांना ओळखले नाही. भारतात कोणी घाबरत नाही, आम्ही लढणारे आहोत. केंद्रीय संस्था त्यांच्यासोबत आहेत, आम्ही इंडिया आघाडी स्थापन करून आलो आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर... मला सांगायचे आहे की, भाजपच्या लोकांना बॅनरवर लिहून दाखवा की भाजपसोबत तीन पक्ष आहेत... ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग. आता वेळ आली आहे किती दिवस टीका करत राहायची. एक व्यक्ती आणि एका पक्षाचे सरकार देशासाठी घातक ठरले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले,  संमिश्र सरकार आणावे लागेल, सर्व राज्यांचा आदर करणारे सरकार आणावे लागेल. तरच देशाचा उद्धार होईल. आम्ही निवडणूक प्रचारासाठी आलो नाही, लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहोत. अरविंद केजरीवाल यांना आरोपी करून तुरुंगात टाकले. हे कसले सरकार? भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना भाजपने वॉशिंग मशिनमध्ये ठेवले, त्यांना आंघोळ घालून मंचावर बसवले. तुम्ही त्यांच्यावर विश्वास कसा ठेवू शकता?

INDIA Bloc Rally
Nitin Gadkari: नितीन गडकरींपेक्षा त्यांची पत्नी तिप्पट श्रीमंत, मुंबईत 2 घरांची मालकीण! एकूण मालमत्ता जाणून घ्या...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.