युएनच्या सुरक्षा परिषदेत भारताचा चीनविरोधात बहिष्कार

सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताची सडेतोड भूमिका
S Jaishankar
S Jaishankar
Updated on

न्यूयॉर्क - भारत आणि चीनमधील (India-China) तणाव अद्याप कायम असून आता त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पडसाद उमटत आहेत. संयुक्त राष्ट्रांत (United Nations) चीनच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सुरक्षा परिषदेच्या (Security council) बैठकीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी बहिष्कार (boycotts) घालत ड्रॅगनला सूचक इशारा दिला आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी या बैठकीचे नेतृत्व केले. या बैठकीदरम्यान भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला यांनी केले. मागील वर्षी चीनने लडाखमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी करताना जवानांवर हल्ला केला होता. यामुळे सीमावर्ती भागामध्ये अभूतपूर्व तणाव निर्माण झाला होता. (India boycotts China at UN Security Council)

S Jaishankar
DRDOच्या 2-DG कोरोना प्रतिबंधक औषधाला DGCIची परवानगी

या बैठकीमध्ये बहुपक्षीय रचनेवर चर्चा होणे अपेक्षित होते. शृंगला यांनी त्यांच्या भाषणात कोरोना संकटाच्या काळातील अनेक धोके आणि व्यवस्थात्मक दोष चव्हाट्यावर आल्याचे सांगितले. व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या या परिषदेला १४ सदस्य देशांच्या मंत्रिस्तरीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. शृंगला यांनी त्यांच्या भाषणात संसर्गाला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांवर भाष्य केले.‘‘ जागतिक पातळीवर या संकटाचा सामना करताना सर्वसमावेशक प्रयत्नांचा अभाव दिसून आला तसेच बहुस्तरीय व्यवस्थेची कमकुवत बाजू चव्हाट्यावर आली. लशींच्या वितरणामध्ये असमतोल पाहायला मिळाला’’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या संकटाच्या काळामध्ये वैश्‍विक सहानुभूती आणि बहुपक्षीय व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मदत करणाऱ्यांचे आभार

भारताने आजपर्यंत जगातील दीडशेपेक्षाही अधिक देशांना लशी आणि औषधे पुरविली आहेत. आता आमचा देश देखील संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना जगभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. याबद्दल आम्ही मदत करणाऱ्या देशांचे आभारी आहोत, असे शृंगला यांनी सांगितले. या बैठकीमध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन, रशियाचे सर्गेई लावरोव्ह आदी मंडळी सहभागी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.