India China Conflict : अरुणाचल अन् चीनसोबतचा सीमावाद काय? भारताच्या 'या' भागांवर ड्रॅगनची नजर

भारताचा हजारो किलोमीटरचा भूभाग चीन स्वतःचा असल्याचा दावा करत आला आहे.
India China Conflict
India China Conflict Sakal
Updated on

India China Conflict : गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन सैन्याच्या झटापटीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये पुन्हा एकदा भारत-चीनचे सैनिक एकमेकांना भिडले आहेत.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

India China Conflict
India-China Tawang Clash: गलवानची पुनरावृत्ती! तवांगमध्ये भारत-चीनचं सैन्य एकमेकांना भिडलं; 30 जखमी

या झटापटीत ३० जवान जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावर भारताकडून आणि चीनकडून कुठलंही स्पष्टीकरण अद्याप आलेलं नाही. आज आम्ही अरूणाचल प्रदेश आणि चीन सोबतचा नेमका वाद काय? आणि चीनची भारताच्या नेमक्या कोणत्या भागांवर नजर आहे. यााबाबत माहिती सांगणार आहोत.

भारताचे असे दोन शेजारी आहेत, ज्यामुळे प्रत्येकवेळी सीमेवर तणाव असतो. यामध्ये जम्मू-काश्मीरबाबत पाकिस्तानसोबतचा वाद तर, चीनसोबत लडाख, आणि अरुणाचल प्रदेशातील सीमावाद आघाडीवर आहे. भारताचा हजारो किलोमीटरचा भूभाग चीन स्वतःचा असल्याचा दावा करत आला आहे. चीनसोबत पूर्व लडाखमध्ये मे 2020 पासून तणाव असून, आता ड्रॅगनची नजर अरुणाचलला लागून असलेल्या सीमेवर आहे.

India China Conflict
"गलवान खोऱ्यात २-४ नव्हे तर ३८-५० चिनी जवान मारले गेले"

अरुणाचलच्या सीमेवर चीन झपाट्याने पायाभूत सुविधा विकसित करत आहे. यामध्ये रेल्वे, रस्ते आणि हवाई संपर्काचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर अरूणाचलच्या सीमेजवळ चीन गावे देखील बनवत आहे. अरुणाचल प्रदेशाबाबत चीनसोबत दीर्घकाळापासून सीमावाद सुरू आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयानुसार, अरुणाचल प्रदेशातील सुमारे ९० हजार चौरस किलोमीटर भूभागावर चीन दावा करत आहे. मात्र, अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असूनही चीन सातत्याने कुरघोड्या करत आहे.

India China Conflict
India-China : गलवान संघर्षात 38 चिनी सैनिकांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियन रिपोर्टमधून खुलासा ; पाहा व्हिडीओ

भारताच्या कोणत्या भागावर आहे चीनची नजर?

1. पँगॉन्ग त्सो सरोवर (लडाख)

हे सरोवर 134 किलोमीटर लांब आहे, जे हिमालयात सुमारे 14 हजार फूट उंचीवर आहे. या सरोवराचा 44 किमी क्षेत्र भारतात येते आणि सुमारे 90 किमी क्षेत्र चीनमध्ये आहे. या तलावातून LAC देखील जाते. त्यामुळे येथे संभ्रम कायम असून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे.

2. गलवान व्हॅली (लडाख)

गलवान व्हॅली लडाख आणि अक्साई चीनदरम्यान वसलेली आहे. येथे एलएसी अक्साई चीनला भारतापासून वेगळे करते. ही दरी चीनच्या दक्षिणेकडील शिनजियांग आणि भारताच्या लडाखपर्यंत पसरलेली आहे. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात चीनी सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये संघर्ष झाला होता.

India China Conflict
India-China | गलवान, डोकलाम, तवांगमध्ये भारत-चीन संघर्ष का होतो?

3. डोकलाम (भूतान)

डोकलाम हा भूतान आणि चीनमधील वाद असला तरी तो सिक्कीम सीमेजवळ येतो. हे एक प्रकारे ट्राय जंक्शन आहे, जिथून चीन, भूतान आणि भारत जवळ आहेत. भूतान आणि चीन दोघेही या भागावर आपला दावा करतात. भूतानच्या दाव्याला भारताचा पाठिंबा आहे. 2017 मध्ये डोकलामवरून भारत आणि चीनमध्ये सुमारे अडीच महिने तणाव निर्माण झाला होता.

4. तवांग (अरुणाचल प्रदेश)

अरुणाचल प्रदेशात येणाऱ्या तवांगवर चीनची करडी नजर आहे. तवांग हे बौद्धांचे प्रमुख धार्मिक स्थळ आहे. याला आशियातील सर्वात मोठा बौद्ध मठ देखील म्हटले जाते. तर, चीन तवांगला तिबेटचा भाग असल्याचे सांगत आहे. 1914 मध्ये झालेल्या करारात तवांगचे वर्णन अरुणाचलचा भाग म्हणून करण्यात आले होते. मात्र, 1962 च्या युद्धात चीनने तवांगवर ताबा मिळवला होता. परंतु, युद्धविरामानुसार चीनला तवांग वरील ताबा सोडावा लागला होता.

5. नथु ला (सिक्कीम)

नाथू ला हिमालयातील एक पर्वतीय खिंड आहे. हे भारतातील सिक्कीम आणि दक्षिण तिबेटच्या चुंबी खोऱ्याला जोडते. हे ठिकाण 14,200 फूट उंचीवर असून, हे स्थान भारतासाठी महत्त्वाचे आहे. कारण येथूनच लाखो यात्रेकरू कैलास मानसरोवर यात्रेसाठी जातात. नथु ला वरून भारत आणि चीनमध्ये कोणताही वाद नाही. पण कधी-कधी या भागातही भारत आणि चीनच्या सैन्यात चकमकी झाल्याच्या बातम्या समोर येत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.