India-China Conflict : पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण! चीनचेही एक पाऊल मागे; दिवाळीनिमित्त सैनिक देणार परस्परांना मिठाई

India-China disengagement at LAC Latest Update : दोन्ही देशांचे लष्कर हे या दोन ठिकाणांवर गस्त घालणार असल्याने त्यासाठी नेमकी कोणत्या घटकांना प्राथमिकता द्यायची याबाबतची सविस्तर बोलणी कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांदरम्यान होईल.
India-China disengagement
India-China disengagement
Updated on

नवी दिल्ली, ता.३० ः पूर्व लडाखमधील देमचोक आणि देपसांग या दोन संघर्षबिंदूंवरून भारत आणि चीनच्या लष्करी माघारीची प्रक्रिया आज पूर्ण झाली. आता लवकरच दोन्ही देशांचे लष्कर या ठिकाणी गस्त घालायला सुरूवात करणार असल्याचे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले. चिनी परराष्ट्र मंत्रालयाकडून देखील याला दुजोरा देण्यात आला आहे. उद्या (ता.१) रोजी दिवाळसण असल्याने दोन्ही देशांचे सैनिक परस्परांना मिठाईचे वाटप करून शुभेच्छा देतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.