China: भारताचे टेन्शन वाढणार! चीनचे संतापजनक कृत्य LOC वर पाकिस्तानसाठी...

Pakistan: लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी प्रगत रडार यंत्रणाही बसवण्यात आली आहे. या रडारमुळे कमी उंचीवरील लक्ष्य शोधण्याची पाकिस्तानी लष्कराची क्षमता वाढेल.
India China Pakistan LOC POK Military
India China Pakistan LOC POK MilitaryEsakal
Updated on

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) लष्करी मदत वाढवून चीन आपल्या नापाक मनसुब्यांना खतपाणी घालत आहे. भारतासोबतच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LOC) पाकिस्तानी लष्करासाठी स्टीलचे बंकर बांधत आहे. ते पाकिस्तानी लष्कराला मानवरहित लढाऊ विमाने आणि इतर उपकरणेही पुरवत आहे.

चीनच्या मदतीने सीमेवर शक्तिशाली कम्युनिकेशन टॉवर बसवले जात आहेत. भूमिगत फायबर केबल टाकण्याचे कामही जोरात सुरू आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी प्रगत रडार यंत्रणाही बसवण्यात आली आहे. या रडारमुळे कमी उंचीवरील लक्ष्य शोधण्याची पाकिस्तानी लष्कराची क्षमता वाढेल. त्याच्या सैन्य आणि हवाई संरक्षण युनिट्सना गुप्तचर मदत मिळेल.

पाकिस्तानसोबतचे संबंध मजबूत करण्यासाठी आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK), विशेषत: चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) शी संबंधित असलेल्या चिनी गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी चीनचे प्रयत्न म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.

India China Pakistan LOC POK Military
Shashi Tharoor: शशी थरूर यांना धक्का, सहाय्यकाला दिल्ली विमानतळावर अटक; 'हा' गंंभीर गुन्हा गेल्याचा आरोप

नियंत्रण रेषेवर विविध ठिकाणी चिनी 155 मिमी हॉवित्झर तैनात करण्यात आले आहेत. हे विशेषतः CPEC च्या आसपास आहेत.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फॉरवर्ड पोस्टवर चिनी लष्कराच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची उपस्थिती आढळलेली नाही. परंतु चिनी सैनिक आणि अभियंते भूमिगत बंकर्ससह पायाभूत सुविधांची स्थापना करत असल्याचे इंटरसेप्टर्सने उघड केले. पीओकेच्या लिपा व्हॅलीमध्येही बोगदे बांधले जात होते. हे बोगदे काराकोरम हायवेला जोडेल असे मानले जात आहे.

India China Pakistan LOC POK Military
Remal Cyclone: रेमाल चक्रीवादळामुळे आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू; कुठल्या राज्यात किती विनाश?

भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशाने यापूर्वी गिलगिट आणि बाल्टिस्तानमधील चिनी कारवायांवर आक्षेप व्यक्त केला आहे. सततच्या तणावामुळे भारत सतर्क आहे आणि सीमेपलीकडून नापाक मनसुबे हाणून पाडण्यासाठी सज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.