चीनने LAC वर बसवला 5G टॉवर; लडाखमधील नागरिकांमध्ये अस्वस्थता

China Activity in Ladakh News
China Activity in Ladakh NewsChina Activity in Ladakh News
Updated on

लेह : लडाखमधील नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या (China) लष्करामधील चर्चेची १६ वी फेरी रविवारी (ता. १६) होणार आहे. आतापर्यंत १५ वेळा दोन्ही देशांनी वाटाघाटीवर चर्चा केली. परंतु, करार होऊ शकला नाही. रविवारी होणारी चर्चा भारतीय (India) हद्दीत होणार आहे. या चर्चेपूर्वी चिनने येथे ५G टॉवर बसवले आहेत. त्यांची संपर्क व्यवस्था खूप चांगली आहे.

भारत (India) सतत शांतता आणि स्थिरतेवर भर देत आहे. यासोबतच चकमकीच्या ठिकाणाहून सैन्य मागे घ्यावे, असे भारताचे म्हणणे आहे. त्याचवेळी नियंत्रण रेषेला लागून असलेल्या लडाख भागात राहणारे लोक चीनच्या हालचालींमुळे हैराण झाले आहेत. १२ पैकी १० गावांमध्ये ४G नेटवर्क नाही. काही गावांमध्ये २G नेटवर्कही नाही, परंतु, चिनने येथे ५G टॉवर (5G tower) बसवले आहे. त्यांची संपर्क व्यवस्था खूप चांगली आहे.

China Activity in Ladakh News
मंत्रिमंडळाचा विस्तार १९ तारखेला?; भाजपकडून दोघांचे नाव आघाडीवर

चिनने (China) पॅंगॉन्ग सरोवरावर दोन पूल बांधले आहेत. त्यामुळे चिनी सैन्याचा प्रवेश खूप वाढेल. त्यांना येणे-जाणे सोपे होईल. या पुलाच्या बांधकामामुळे चीनला तोफखानाही सहज उपलब्ध होणार आहे. पॅंगॉन्गमध्ये लाइफलाइन आहे. जर येथे बोगदा बांधला तर तो भारतासाठी खूप फायदेशीर ठरेल.

चीन ज्या वेगाने बोगदे, पूल आणि रस्ते बांधत आहे त्यामुळे भविष्यात त्यांच्यासाठी त्रास होऊ शकतो, अशी भीती एलएसीच्या शेजारील भागात राहणाऱ्या लोकांना आहे. एवढेच नाही तर चीनकडून होत असलेल्या बांधकामाबाबतही त्यांचा हेतू स्पष्ट दिसत आहे.

भारताने चीनला दिला होता इशारा

वाटाघाटीच्या १५ फेऱ्या अनिर्णित ठरल्यानंतर चीनला भारताकडून ताकीद देण्यात आली आहे की वास्तविक नियंत्रण रेषेच्या (LAC) व्यवस्थापनासाठीच्या करारांचे प्रामाणिकपणे पालन केले पाहिजे. भारत व चीनमध्ये १९९३ आणि १९९६ मध्ये झालेल्या योग्य करारांचे निष्ठेने पालन केले पाहिजे. लडाखमध्ये (Ladakh) दोन वर्षांपासून भारत आणि चीन यांच्यात संघर्ष सुरू आहे, असे अलीकडेच परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.