मोदीजी पंतप्रधान आहेत, तोपर्यंत इथली एक इंचही जमीन कोणी घेऊ शकणार नाही; अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

भारत-चीन संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणले गेले आहेत.
Amit Shah
Amit Shahesakal
Updated on

भारत-चीन संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणले गेले आहेत. भारत आणि अमेरिकेच्या सुरु असलेल्या युद्ध सरावावर चीननं आक्षेप घेतल्याची बातमी ताजी असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आलीय.

अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये सीमाभागात भारत आणि चिनी सैन्य आमनेसामने आल्याची माहिती समोर आलीय. दोन्ही देशाच्या सैन्यामध्ये झालेल्या झडपमध्ये दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भाष्य करत काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका केलीय.

Amit Shah
India-China Clashed : भारत-चीन संघर्षाची 108 वर्षे जुनी कहाणी; 'या' 5 घटनांनी बदलला इतिहास!

भारत-चीनच्या मुद्द्यावर अमित शहा म्हणाले, 'काँग्रेसनं राजकारण करणं थांबवावं. आमच्या सैनिकांनी ज्या प्रकारे शौर्य दाखवलं आणि आमच्या मातृभूमीचं रक्षण केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. काँग्रेसच्या काळात हजारो किलोमीटर जमीन आमच्याकडून चीननं बळकावली आहे. मात्र, सध्या भाजपचं सरकार आहे, त्यामुळं एक इंचही जमीन कोणीही घेऊ शकणार नाही.'

शाह पुढं म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात चीननं भारताची हजारो हेक्टर जमीन बळकावली होती. राजीव गांधी फाऊंडेशननं 2005-2006-07 या आर्थिक वर्षात 1 कोटी 20 लाखांचं अनुदान मिळवून दिलं. संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेनंतर गृह मंत्रालयानं त्याची नोंदणी रद्द केली आहे. चिनी दूतावासाकडून मिळालेली रक्कम भारत-चीन संबंधांच्या विकासाकरिता संशोधनासाठी देण्यात आली होती. 1962 मध्ये चीननं बळकावलेल्या हजारो हेक्टर जमिनीत त्याचा समावेश होता का? असा सवाल त्यांनी केलाय.

Amit Shah
Narendra Modi : मोदींची हत्या करायला तयार राहा म्हणणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक

2006 मध्ये चिनी दूतावासानं संपूर्ण अरुणाचलवर दावा केला होता. 25 मे 2007 रोजी चीननं काँग्रेसचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांना व्हिसा नाकारला. तर 2009 ला मनमोहन सिंग यांच्या अरुणाचल भेटीवर चीननं आक्षेप घेतला. 2010 मध्ये त्यांनी काश्मीरमधील लोकांना स्टेपल्ड व्हिसा देण्यास सुरुवात केली. 2011 मध्ये काँग्रेस सरकारनं चीनच्या धमक्यांमुळं डेंगचोकमध्ये रस्ते आणि पायाभूत सुविधांचं बांधकाम थांबवलं. मला काँग्रेसला विचारायचं आहे की, जनतेसमोर दुटप्पीपणा चालत नाही. जनता सगळं पाहत आहे. त्यांची FCRA नोंदणी रद्द करण्यात आलीय. काँग्रेसच्याच काळात हजारो किलोमीटर जमीन बळकावण्यात आली आहे. हे सर्व विषय जनतेला माहीत आहेत. हे भाजपचं सरकार आहे. मोदीजी पंतप्रधान आहेत, तोपर्यंत कोणी एक इंचही जमीन काबीज करू शकत नाही, असंही शहांनी ठणकावून सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.