कोरोनाच्या रुग्णात झपाट्यानं वाढ, Omicron ची रुग्णसंख्या १२७० वर

India Omicron Cases
India Omicron Casessakal media
Updated on

नवी दिल्ली : देशात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला तेव्हापासून कोरोना रुग्णांची संख्या (India Corona Cases) झपाट्याने वाढत आहे. तसेच ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत (India Omicron Cases) देखील चिंताजनक वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १६ हजार ७६४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, ओमिक्रॉन रुग्णांची आकडेवारी १२७० वर पोहोचली आहे.

India Omicron Cases
ओमिक्रॉन तपासणी अहवाल येण्यापूर्वीच रुग्णाचा ह्रदयविकाराने मृत्यू

गेल्या २४ तासांत देशात २२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १६७६४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ७ हजार ५८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ९१३६१ रुग्ण सक्रीय असून रुग्ण बरे होण्याचा दर ९८.३६ टक्के इतका आहे. कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे काही राज्यांनी निर्बंध घोषित केले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असल्याने लग्न आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांवर पूर्वीसारखीचे निर्बंध लादण्यात आले आहेत. आज मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू झाले आहेत.

ओमिक्रॉनची रुग्णसंख्या १२७० वर -

देशात याच महिन्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून पाहता पाहता रुग्णसंख्या १२७० वर पोहचली. यामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्यापाठोपाठ दिल्लीत रुग्णसंख्या वाढतेय. तसेच ओमिक्रॉनबाधित एका रुग्णाचा हृदयविकाराच्या धक्क्याने गुरुवारी मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. हा रुग्ण महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमधील आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण -

  • महाराष्ट्र - ४५०

  • दिल्ली - ३२०

  • केरळ - १०९

  • गुजरात - ९७

  • राजस्थान - ६९

  • तेलंगणा - ६२

  • कर्नाटक - ३४

  • आंध्र प्रदेश -१६

  • हरियाणा - १४

  • ओडिशा - १४

  • पश्चिम बंगाल - ११

  • मध्य प्रदेश - ०९

  • उत्तराखंड - ०४

  • चंदीगढ - ०३

  • जम्मू-काश्मीर - ०३

  • अंदमान-निकोबार - ०२

  • उत्तर प्रदेश - ०२

गोवा, हिमालच प्रदेश, लडाख, मणिपूर, पंजाबमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.