Corona Virus : दहा देशात कोरोनाचा पुन्हा धुमाकूळ, जाणून घ्या भारताची स्थिती

चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ होतान दिसून येत आहे.
corona virus
corona virus esakal
Updated on

India Corona Update : चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ होतान दिसून येत आहे. रूग्ण वाढीमध्ये चीन आणि त्याच्या आसपासच्या देशांमधील परिस्थिती वाईट असून, यामध्ये जपान, तैवान, हाँगकाँग आदींचा समावेश आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

corona virus
India Corona Update : चिंता वाढली! चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या BF.7 व्हेरिएंटची भारतात एन्ट्री

कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने संपूर्ण जगात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, जगातील दहा देश जेथे कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार माजवण्यास सुरूवात केली आहे. चीनमधील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता भारत सरकारकडून सावध पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

corona virus
Corona Guidelines : विमानतळांवर आजपासून पुन्हा सुरू होणार कोरोना चाचणी

1. चीन : रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये दररोज एक ते दीड लाख कोरोना बाधित आढळून येत आहेत. ही आकडेवारी इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे मानले जात आहे. याशिवाय चीनमध्ये दररोज मृतांची संख्याही दोन ते तीन हजार असल्याचे सांगितले जाता आहे. तज्ज्ञांच्या मते चीनमध्ये पुढील तीन महिन्यात कोरोनामुळे 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर, 80 कोटींहून अधिक लोकांना संसर्ग होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

2. जपान : गेल्या सात आठवड्यांपासून येथे संक्रमित लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. येथे सध्या दररोज 70 हजार ते एक लाख रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी येथे 1.85 लाख संक्रमित आढळून आले आहेत. तर 231 लोकांचा मृत्यू झाला आहे. जपानमध्ये आतापर्यंत 2.73 कोटींहून अधिक लोक कोरोना संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. तर 53 हजार 730 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 63 लाख 78 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

3. दक्षिण कोरिया : येथे मंगळवारी एका दिवसात 87 हजार 559 रूग्ण कोरोना संक्रमित आढळले, तर 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियामध्ये आतापर्यंत 2.83 कोटींहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी 2.71 कोटी रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 31 हजार 490 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या येथे 10 लाख 93 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

corona virus
Corona Update : वाढत्या रूग्णसंख्येत अदर पुनावालांचं भारतीयांसाठी मोठं विधान; म्हणाले...

4. फ्रान्स : फ्रान्शमध्ये मंगळवारी 71 हजार 212 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, 130 लोकांचा मृत्यू झाला. सध्या फ्रान्समध्ये 11 लाख 24 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

5. जर्मनी : जर्मनीमध्ये सध्या दररोज 50 ते 60 हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद केली जात आहे. मंगळवारी येथे 52 हजार 528 नव्या रुग्णांची भर पडली. तर, 201 जणांचा मृत्यू झाला. जर्मनीमध्ये आतापर्यंत 3.70 कोटीहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 3.63 कोटी लोक बरे झाले आहेत, तर 1.60 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या येथे 6.15 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

6. अमेरिका : येथे दररोज 20 ते 30 हजार कोरोना संक्रमित रूग्णांची नोंद केली जात आहे. मंगळवारी येथे 25 हजार 714 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आढळूल आले आहेत. 308 लोकांचा मृत्यू झाला. अमेरिकेत आतापर्यंत 10 कोटी 18 लाखांहून अधिक लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 9.89 कोटी लोक बरे झाले आहेत, तर 11 लाख 13 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 17 लाख 75 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

corona virus
Coronavirus: कोरोना अद्याप संपलेला नाही; केंद्रीय आरोग्य मंत्र्याचं मोठं विधान

7. तैवान : येथे दररोज साधारण 15 ते 30 हजार संक्रमित आढळून येत आहेत. मंगळवारी येथे 17 हजार 117 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तैवानमध्ये आतापर्यंत 86 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 82 लाख लोक बरे झाले आहेत, तर 14 हजार 931 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या येथे 2.92 लाख रुग्ण उपचार घेत आहेत.

8. हाँगकाँग : चीनच्या प्रशासकीय कक्षेत असणाऱ्या हाँगकाँगमध्ये दररोज 12 ते 20 हजार संक्रमित आढळून येत असल्याचे समोर येत आहे. मंगळवारी येथे एकूण 14 हजार 982 संक्रमितांची नोंद करण्यात आली तर, 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत येथे 23 लाख 85 हजारांहून अधिक संक्रमितांची नोंद करण्यात आली असून, त्यापैकी 19 लाख 81 हजार नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, 11 हजार 243 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या येथे 3.93 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

9. पेरू : पेरूमध्ये मंगळवारी आठ हजार कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत येथे 44 लाखांहून अधिक नागरिक कोरोनाच्या विळख्यात आळे आहेत. त्यापैकी 41 लाख रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 2.17 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. पेरूमध्ये सध्या 94 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

10. रशिया : रशियामध्ये दररोज पाच ते दहा हजार कोरोना बाधित आढळून येत आहेत. मंगळवारी येथे 57 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या रशियामध्ये 2.11 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

corona virus
Corona In Maharashtra : पुन्हा मास्क, पुन्हा निर्बंध? कोरोनाबाबत फडणवीसांची मोठी घोषणा

भारताची स्थिती काय ?

सर्वाधिक रूग्ण आढळणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 51 व्या स्थानावर आहे. मंगळवारी भारतात 103 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाही रूग्णाचा मृत्त्युची नोंद करण्यात आलेली नाही. भारतात आतापर्यंत 4.46 कोटी नागरिक कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 4.41 कोटींहून अधिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 5.30 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात सध्या 4,527 रुग्ण उपचार घेत आहेत. सक्रिय रूग्णांबाबत भारत सध्या जगात 90 व्या क्रमांकावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()