देशात चोवीस तासात ३ लाख नवे रुग्ण, तर ४३९ जणांचा मृत्यू

Corona-patient
Corona-patient
Updated on

देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना तत्काळ दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मागील चोवीस तासात देशात ३ लाख ६ हजार ६४ रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णसंख्या कालपेक्षा २७ हजार ४६९ ने कमी आहे. (Indian Corona Update)

भारतात आज कोरोना संसर्गात घट झाल्याचं दिसतंय. नव्याने समोर आलेली आकडेवारी 20 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेटसह समोर आली असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, नवीन आकडेवारी रविवारी नोंदवल्यापेक्षा 27 हजार 469 ने कमी होती. (India corona news)

मात्र दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर काल 17.78 टक्क्यांवरून 20.75 टक्क्यांवर पोहोचला. उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या 24 तासांत 14,74,753 चाचण्या घेण्यात आल्या आहेत तर रविवारी चाचण्यांची संख्या 18,75,533 वर गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.