तब्बल सात महिन्यानंतर पहिल्यांदा देशातील कोरोना सक्रीय रुग्णसंख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे.
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळू हळू कमी होत आहे. रविवारी नव्या कोरोना रुग्णांची संख्या १५ हजारांपेक्षा कमी असून मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे सक्रीय रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. तब्बल सात महिन्यानंतर पहिल्यांदा देशातील कोरोना सक्रीय रुग्णसंख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे. २२९ दिवसांमधील ही सर्वात कमी सक्रीय रुग्णसंख्या आहे. रविवारी दिवसभरात देशात १४४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत देशातील ४ लाख ५२ हजार १२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासा देणारी बाब म्हणजे रिकव्हरी रेट ९८.१० टक्के इतका झाला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यानंतर सध्याचा रिकव्हरी रेट सर्वाधिक आहे. रविवारी देशात १४ हजार १४६ नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशात एकूण ३ कोटी ४० लाख ६७ हजार ७१९ जणांना कोरोनाची लागण झाली.
मागील २४ तासात देशात १९ हजार ७८८ जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत देशातील ३ कोटी ३४ लाख १९ हजार ७४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशातील सक्रीय रुग्णांचे प्रमाण हे ०.५७ टक्के इतके आहे. मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच इतकी कमी सक्रीय रुग्णसंख्या आहे. सध्या देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाख ९५ हजार ८४६ इतकी आहे.
कोरोनावर प्रतिबंधक लसीकरण मोहिम देशभरात वेगाने सुरु आहे. लवकरच भारत १०० कोटी डोसचा टप्पा गाठणार आहे. आतापर्यंत ९७ कोटी ६५ लाख ८९ हजार ५४० जणांना लस दिली आहे. गेल्या २४ तासात ४१ लाख २० हजार ७७२ जणांना लस देण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.