Corona Update: देशातील कोरोना मृत्यू 4 लाखांच्या पार

corona updates Marathi News
corona updates Marathi News
Updated on
Summary

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या आता नोंदली जात आहे. त्यामुळे भारतातील कोरोनासंख्या स्थिरतेकडे जात असल्याचं चित्र आहे.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या आता नोंदली जात आहे. त्यामुळे भारतातील कोरोनासंख्या स्थिरतेकडे जात असल्याचं चित्र आहे. गेल्या 24 तासांत भारतात 46 हजार 917 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 59 हजार 384 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 853 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गुरुवारी हजारांपेक्षा अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (india corona update today active cases health ministry)

भारतात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरुच आहे. दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. देशात डेल्टा व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 4 लाख 58 हजार 251 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर 3 कोटी 95 लाख 48 हजार 302 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. देशात सध्या कोरोनाचे 5 लाख 09 हजार 637 सक्रिय रुग्ण आहेत. देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आज चार लाखांचा आकडा पार केला आहे. रिकव्हरी रेट 97.1 टक्के झाला आहे.

गेल्या 50 दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ही दिलासादायक बाब आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत देशातील 34 कोटी 76 हजार 232 लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी पर्याय असल्याचं सांगितलं जातंय.

corona updates Marathi News
'जॉन्सन अँड जॉन्सन' लशीचा एक डोस डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी

महाराष्ट्राची कोरोना आकडेवारी

राज्यात गुरुवारी 9,195 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. नवीन 8,634 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,28,535 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,16,667 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.01% झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.