coronavirus in india, covid-19, latest updates : मागील दीड महिना देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. आता मात्र त्याला उतरती कळा लागली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या घटत असून, अडीच लाखांपर्यंत गेलेली दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या घटून एक लाख 52 हजारांवर आली आहे. कोरोना संसर्गाचा दरही आठ टक्क्यांवर राहून सलग सहाव्या दिवशी तो दहा टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत एकूण रुग्णसंख्येत 88 हजारांनी घट नोंदविली गेली असून आता देशातील एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण ७.५८ टक्के आहे. देशात सध्या उपचाराधीन रुग्ण 20 लाख 26 हजार इतके झाले आहेत. मागील 24 तासांत तीन हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.
दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत सतत घट झालेली आढळत असून, सलग तिसऱ्या दिवशी दोन लाखांहून कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सलग सतराव्या दिवशी कोविडमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही उपचाराधीन रुग्णांच्या तुलनेत वाढलेली असून गेल्या 24 तासांत दोन लाख 38 हजार 22 रूग्ण कोविडमुक्त झाल्याची नोंद झाली आहे.
रविवारी वाढलेले कोरोना रुग्ण - 1,52,734
रविवारी कोरोनामुक्त झालेले रुग्ण - 2,38,022
24 तासांतील मृताची संख्या - 3,128
एकूण कोरोना रुग्ण - 2,80,47,534
एकूण कोरोनामुक्त : 2,56,92,342
एकूण मृत्यू : 3,29,100
उपचाराधीन रुग्ण : 20,26,092
एकूण लसीकरण : 21,31,54,129
गेल्या चोवीस तासांत देशात एकूण 16 लाख 83 हजार 883 चाचण्या घेण्यात आल्या आणि आतापर्यंत भारताने एकूण 34 कोटी चाचण्या पूर्ण केल्या आहेत. देशभरात एकीकडे चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आज देशभरात दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसींच्या एकूण संख्येने २१ कोटीचा टप्पा ओलांडला आहे, असा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.