Manipur Violence: मणिपूरवरील चर्चेसाठी 'इंडिया'ने राष्ट्रपतींकडे मागितली वेळ, मल्लिकार्जून खर्गे करणार नेतृत्व

INDIA asked for Presidents Time:इंडिया युतीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याचा मानस दर्शवला असून मणिपूर हिंसाचारावर लक्ष्य वेधण्यासाठी त्यांची भेटीसाठी वेळ मागितली आहे.
opposition leader
opposition leader Esakal
Updated on

Manipur Violence:सध्या भारतामध्ये मणिपूर हिंसाचारावर राजकीय वातावरण तापलंय. सोमवारी (दि.३१ जुलै) कॉंग्रेसच्या ६८ खासदारांनी संसदेला मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी नोटीस पाठवली होती. मात्र, यावर फक्त एक तास चर्चा होईल आणि विरोधकांना यामध्ये बोलता येणार नाही, असे त्यांना सांगण्यात आलं.

खासदारांनी मणिपूर हिंसाचारावर बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी संसदेत यावं अशी मागणी केली होती. इंडिया युतीच्या नेत्यांनी मणिपूर प्रश्नावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची वेळ मागितला आहे.

काही दिवसांपूर्वी विरोधक खासदारांचं एक शिष्टमंडळ मणिपूर येथील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर या नेत्यांनी संसदेत या मुद्यावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी केली. मात्र, त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही.(Latest Marathi News)

आता इंडिया युतीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याचा मानस दर्शवला असून मणिपूर हिंसाचारावर लक्ष्य वेधण्यासाठी त्यांचा भेटीसाठी वेळ मागितला आहे. राज्यसभेच्या विरोधक नेत्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व मल्लिकार्जून खरगे हे करणार आहेत. यावेळी या भेटीसाठी मणिपूरला जाऊन आलेले २१ खासदार आणि संसदेतील गटनेत्यांसोबत भेटीची वेळ मागण्यात आली आहे.

opposition leader
Satyapal Malik : सत्यपाल मलिक यांचा पंतप्रधान मोदींबाबत खळबळजनक विधान; म्हणाले निवडणुकीआधी...

६८ खासदारांनी मणिपूर विषयावर चर्चा करण्याची संसदेला नोटीस दिली होती,पण सरकार चर्चेपासून लांब पळतय,असा आरोप कॉंग्रेस खासदाराने केला होता. यावेळी कॉंग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींनी सभागृहात येऊन चर्चा करावी अशी मागणी केली होती. (Latest Marathi News)

कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार रणदीप सुरजेवाला म्हणाले की,"राज्यसभेच्या ६८ खासदारांनी मणिपूर विषयावर चर्चा करण्यासाठी नोटीस दिली आहे. मात्र, सरकार यापासून लांब पळत आहे. सरकारल असं वाटतंय की चर्चा एका तासापेक्षा जास्त नाही झाली पाहिजे आणि त्यावेळी विरोधकांनी यावर बोलू नये. पंतप्रधानांनी संसदेत यावं आणि या विषयावर बोलावं."

opposition leader
Sambhaji Bhide : संभाजी भिडेंची चौकशी होणार; पोलिस आयुक्त म्हणतात...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.