India GDP: भारताचा GDP 3.75 ट्रिलियन डॉलरवर! ब्रिटन, फ्रान्स आणि रशियाला भारतानं टाकलं मागे

जागतीक अर्थव्यवस्थेत वाढतोय भारताचा टक्का
India GDP: भारताचा GDP 3.75 ट्रिलियन डॉलरवर! ब्रिटन, फ्रान्स आणि रशियाला भारतानं टाकलं मागे
Updated on

नवी दिल्ली : भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनानं अर्थात जीडीपीनं नव किर्तीमान प्रस्थापित केलं आहे. त्यानुसार भारताचा जीडीपी हा ३.७५ ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे. यामुळं जागतीक अर्थव्यवस्थेत भारताचा टक्का वाढत असल्याचं हे द्योतक आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करत म्हटलं आहे. (India GDP becomes 3.75 trillion dollars India left Britain France and Russia behind)

सीतारामन यांच्या ट्विटनुसार, भारताचा जीडीपी आता ३.७५ ट्रिलियन डॉलवर पोहोचला आहे. सन २०१४ मध्ये तो २ ट्रिलियन डॉलरवर होता. पण नव्या किर्तीमानामुळं आता भारत जगातील १० व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेकडून ५ व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचला आहे. जागतीक अर्थव्यवस्थेत यामुळं भारत चमकदार तारा बनला असल्याचंही सीतारामन यांनी म्हटलं आहे. (GDP News)

India GDP: भारताचा GDP 3.75 ट्रिलियन डॉलरवर! ब्रिटन, फ्रान्स आणि रशियाला भारतानं टाकलं मागे
Cyclone Biparjoy: पुढील 12 तास महत्वाचे! 'बिपरजॉय' धारण करणार रौद्ररुप; 'या' भागासाठी IMDच्या सज्जतेच्या सूचना

जगातील दहा सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था

अमेरिका - 26,854 ट्रिलियन डॉलर

चीन- 19,374 ट्रिलियन डॉलर

जपान - 4,410 ट्रिलियन डॉलर

जर्मनी- 4,309 ट्रिलियन डॉलर

भारत - 3,737 ट्रिलियन डॉलर

ब्रिटन - 3,159 ट्रिलियन डॉलर

फ्रन्स - 2,924 ट्रिलियन डॉलर

कॅनडा - 2,089 ट्रिलियन डॉलर

रशिया - 1,840 ट्रिलियन डॉलर

ऑस्ट्रेलिया - 1,550 ट्रिलियन डॉलर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.