नवी दिल्ली : जगाची लोकसंख्या आज ८ अब्जावर पोचली आहे. २०५० पर्यंतच्या लोकसंख्येत निम्म्याहून अधिक वाढ ही आठ देशाभोवती अधिक केंद्रित असेल, असा अंदाज वर्तविला आहे. यात कॉंगो, इजिप्त, इथोपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलिपिन्स आणि टांझानिया या देशांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार भारत हा २०२३ या काळात चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होऊ शकतो.
जागतिक लोकसंख्येने जारी केलेल्या अहवालात म्हटले की, १९५० नंतर प्रथमच २०२० मध्ये जागतिक लोकसंख्या वाढीत एक टक्क्यांची घसरण नोंदली गेली. २०२२ मध्ये दोन सर्वाधिक लोकसंख्येचे दोन देश आशिया खंडातील आहेत. इसवी सन सुरू झाल्यानंतर जगाची लोकसंख्या २० कोटी असल्याचा दावा केला जातो. ही लोकसंख्या १०० कोटींवर पोचण्यासाठी १८०० वर्षे लागली. शंभर ते दोनशे कोटींपर्यंत पोचण्यासाठी जगाला १३० वर्षाचा कालावधी लागला. औद्योगिक क्रांती आणि आरोग्य सेवेत सुधारणा झाल्यानंतर नवजात बालक आणि प्रसूतीच्या मृत्यू दरात घट झाली आहे. त्याचवेळी लोकसंख्या वाढत गेली.
काय परिणाम होणार?
संसर्गजन्य रोगाला निमंत्रण: वाढत्या लोकसंख्येमुळे मानवी संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढू शकते. हवामान बदलामुळे संसर्गजन्य आजाराचा फैलाव होऊ शकते.
अधिक उष्णता: वाढत्या लोकसंख्येमुळे तापमान वाढीचा धोका आहे. त्यामुळे हृदयरोग, श्वसनविकार यासारख्या आजार वाढू शकतात. उष्णतेच्या लाटेमुळे मेंदू, हृदय, मूत्रपिंड यांचे नुकसान हेाऊ शकते.
खाद्य आणि पाणी समस्या: वाढती लोकसंख्या ही भोजन आणि पाणी टंचाईला निमंत्रण देऊ शकते. २०२१ च्या लॅन्सेटच्या अहवालात म्हटले की, वाढत्या तापमानामुळे १९८१-२०२० च्या तुलनेत मका किंवा मका घेण्याचा हंगाम सरासरी सुमारे ९.३ दिवसांनी आणि गहू घेण्याचा हंगाम सहा दिवसांनी कमी झाला आहे. उष्णतेमुळे मत्स्यपालन व्यवसायावर परिणाम शक्य आहे.
वातावरण खराब: वाढत्या लोकसंख्येमुळे व हवामान बदलामुळे हवेतील प्रदूषण वाढणार आहे. उष्णता आणि पृथ्वीच्या उष्णतेत भर टाकणारे जीवाश्म इंधन यामुळे तापमानात वाढ.
पर्यावरण-आरेाग्य तज्ज्ञ चिंतेत
जगाच्या वाढत्या लोकसंख्येवरून पर्यावरण आणि आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. आगामी काळात वाढत्या लोकसंख्येचे पुरेसे पोषण होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुढच्या महासाथीत लोकांच्या आरोग्याची देखभाल कशी होईल, उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांची उष्णतेमुळे काय स्थिती होईल, वाढत्या दुष्काळामुळे पाण्यासाठी संघर्ष होणार का? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
लोकसंख्या तथ्य
२०६४ पर्यंत जगाची लोकसंख्या ९.७ अब्ज होईल. २०६४ नंतर जगाची लोकसंख्या कमी होऊ लागेल.
२१०० पर्यंत जगातील १९५ पैकी १८३ देशात लोकसंख्या वाढीचा दर कमी होईल.
सध्या चीनची लोकसंख्या १.३७ अब्ज आहे तर भारताची लोकसंख्या १.२८ अब्ज आहे.
२०५० पर्यंत मुंबईची लोकसंख्या ४.२४ कोटी होईल आणि जगातील सर्वात व्यग्र शहर म्हणून ओळखले जाईल. त्यानंतर दिल्लीची लोकसंख्या ३.६ कोटी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.