नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अमेरिकेच्या (America) इशाऱ्यानंतरही भारत रशियाकडून अधिक कच्चे तेल (Crude Oil) खरेदी करेल, असे विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. मॉस्कोकडून आणखी तेल खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचेही सीतारमण यांनी सांगितले. सवलतीच्या दरात तेल मिळत असताना ते का विकत घ्यायेचे नाही? असे उत्तर देखील त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे. तसेच राष्ट्रहित आणि गरजांना आपण प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी यावेळी स्षष्ट केले. (Nirmala Sitharaman On Russia Crude Oil)
जर देशाला कमी किमतीत कच्चे तेल दिले जा असेल, तर ते का खरेदी करणार नाही, ज्याचा फायदा आपल्या देशातील जनतेला होईल असेदेखील सीतारमण यांनी सांगितले. युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या रशियावर अमेरिकेने अनेक आर्थिक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या भीतीने जगातील अनेक देशांनी रशियासोबतचा व्यापार बंद केला आहे. त्यामुळेच सुमारे चाळीस दिवसांपासून युद्ध लढणाऱ्या रशियाला सर्व बाजूंनी आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटाच्या काळात रशियाच्या मदतीसाठी भारत पुढे आला आहे. (Russia Ukraine War)
भारत रशियाकडून (Russia) मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी मोठ्या सवलतीत करत आहे, ज्याकडे अमेरिकेची नजर आहे. एवढेच काय तर, काही दिवसांपूर्वी रशियाकडून अधिक तेल विकत घेणे नवी दिल्लीला महागात पडू शकते, असा इशारा अमेरिकेने भारताला दिला होता. सध्या अमेरिकेने इतर देशांना रशियाकडून तेल खरेदी करण्यास मनाई केली नसून, स्वस्त दरात अधिक तेलाची खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका लक्ष ठेवून आहे. गेल्या वर्षी भारताने रशियाकडून 16 दशलक्ष बॅरल तेल खरेदी केले होते, मात्र यावर्षी मार्चपर्यंत भारताने रशियाकडून 13 दशलक्ष बॅरल तेल खरेदी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.