Monsoon IMD News: मान्सूनबाबत आनंदाची बातमी! यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार; जाणून घ्या कशी असेल स्थिती

भारतीय हवामान विभागाने यंदा India Meteorological Department (IMD) सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Monsoon IMD
Monsoon IMD
Updated on

नवी दिल्ली- भारतीय हवामान विभागाने यंदा India Meteorological Department (IMD) सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा सहा टक्के जास्त म्हणजे १०६ टक्के पावसाची नोंद होईल. देशात ८७ सेंटीमीटर पाऊस पडेल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. (India is likely to witness ‘above normal’ monsoon this year, the India Meteorological Department (IMD) said)

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अल निनोचा प्रभाव मान्सूनआधी कमी होणार आहे. कवकुवत ला निनाची परिस्थिती निर्माण होईल. याचा फायदा चांगल्या मान्सूनसाठी होईल. आयएमडीने पत्रकार परिषद घेतली होती. यात सांगण्यात आलंय की, जून ते सप्टेंबरमध्ये पावसाळा असेल. ८ जूनपर्यंत मान्सून येण्याची स्थिती आहे. अल निनोची स्थिती सध्या साधारण आहे. पावसाळा सुरु झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपलेला असेल.

Monsoon IMD
Dhule Unseasonal Rain Damage : शिंदखेड्यात लिंबू, केळीची बाग भुईसपाट! वादळी वाऱ्याचा फटका

भारतातील शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. चांगल्या पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे हाल होतात. शिवाय, पिण्याचा- सांडपाण्याचा प्रश्न देखील सध्या गंभीर बनला आहे. अनेक धरणे कोरडीठाक पडली आहे. अनेक धरणांमध्ये काही दिवस पुरेल इतका पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. चांगल्या पावसामुळे अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळते. त्यामुळे मान्सूनकडून अनेकांना अपेक्षा असतात.

Monsoon IMD
Untimely Rain : कासेगावात द्राक्षबागा जमीनदोस्त! पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

आयएमडीच्या विश्लेषणानुसार, २२ ला निना वर्षांमध्ये जास्त करुन साधारण किंवा साधारणपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. १९७४ आणि २००० या केवळ दोन वर्षांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणाले की, उत्तर गोलार्धात बर्फाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल. याच कारणामुळे दक्षिणपश्चिम भागात मान्सूनच्या काळातील पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा जास्त असेल.

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच आयएमडीने देशात उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात उन्हाचा चटका वाढणार आहे. आयएमडीचे प्रमुख मृत्यूंजय मोहापात्रा यांनी देशाला भयानक उष्पणतेला सामोरे जावे लागेल असं म्हटलं होतं. त्यामुळे आयएमडीच्या मान्सूनच्या या भाकितामुळे काहीचा दिलासा मिळणार आहे. (Rain News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.