INDIA Mumbai Meeting: INDIA च्या बैठकीत 5 मुद्यांवर होणार चर्चा? विरोधकांची महत्त्वाची बैठक, कोण-कोण राहणार उपस्थित?

INDIA vs Modi
INDIA vs Modisakal
Updated on

INDIA Mumbai Meeting: आज मुंबईमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये 28 पक्षांचे जवळ जवळ 63 नेते येण्याची शक्यता आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. बंगळुरू आणि पाटनानंतर आता मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

विरोधी आघाडी 'इंडिया' स्थापन झाल्या पासून आघाडीतील पक्षांच्या समन्वया विषयी अनेक चर्चा झाल्या. याआधी समन्वयक म्हणून नितीश कुमार यांची नियुक्ती होईल अशी चर्चा होती. मात्र आता त्यांनी या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाच म्हटलं जात आहे.

INDIA vs Modi
INDIA : आमचं सर्वकाही 'ओके'; प्रॉब्लेम खोकेवाल्यांचा; अतुल लोंढेंचा खोचक टोला

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे या समन्वयक पदासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात असून त्यांचे नाव आता आघाडीवर आहे. याचबरोबर समन्वय समितीमध्ये कोणकोणत्या पक्षाचे कोणकोणते नेते असतील? हे पाहणे देखील अतिशय उत्सुकतेचं असणार आहे. या समितीमध्ये अकरा सदस्य असतील असे म्हटले जात आहे.

INDIA vs Modi
INDIA Meeting: इंडिया आघाडीची ताकद वाढली! आणखी दोन पक्षांचा समावेश; पटोलेंनी सांगितली उद्याच्या बैठकीची रुपरेषा

आज मुंबई येथे होणाऱ्या बैठकीमध्ये जागावाटपणावर देखील चर्चा होईल असे म्हटले जात आहे. कारण, जर ही आघाडी जर एकजूट ठेवायची असेल तर, प्रत्येका पक्षाला योग्य तो न्याय जागा वाटपात मिळावा अशी अपेक्षा आघाडीतील सर्वच पक्ष करत आहेत. अशा परिस्थितीत जागा वाटपाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जागा वाटपाची चर्चा लवकरात लवकर करण्यात यावी असा सल्ला दिला आहे. या क्षणाला इंडिया आघाडीमध्ये असलेल्या पक्षांची 11 राज्यांमध्ये सरकारं आहेत.

INDIA vs Modi
INDIA : 'इंडिया' आघाडीत पंतप्रधान पदासाठी तीन नावं चर्चेत, पण शर्यतीतून केजरीवाल यांची माघार

आज होणाऱ्या बैठकीमध्ये इंडिया आघाडीचा लोगो जारी केला जाईल असे म्हटले जात आहे. हा लोगो आघाडीच्या प्रचारात वापरला जाईल. मात्र पक्ष त्यांच्याच चिन्हावर लढतील.

INDIA vs Modi
INDIA Alliance : महाराष्ट्रात पाऊल ठेवताच राहुल गांधी प्रतापगडाला देणार भेट? काँग्रेसच्या सरचिटणीसांनी दिली महत्वाची अपडेट

तर दुसरीकडे या आघाडीचा विजय झाला तर पंतप्रधान कोण होणार? याविषयी देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत कोणीही काहीही जाहीर केले नसले तरी पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार? हे पाहणे उत्सुकतेचे असून आज याबाबत चर्चा किंवा निर्णय होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.