India Vs Bharat Name Controversy : इंडिया नाव बदलणार ही केवळ अफवा, मात्र...; केंद्राचं स्पष्टीकरण

Anurag Thakur China-Congress Link
Anurag Thakur China-Congress LinkSakal
Updated on

Anurag Thakur : संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मात्र या अधिवेशनात इंडियाचे नाव भारत करण्यात येईल अशा चर्चा सुरू झाल्याने वेगळ्याच राजकीय वाद संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे.

जी 20 शिखर परिषदेच्या संमेलनावेळी होणाऱ्या विविध देशातील प्रमुखांना डिनरसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बोलावले आहे. मुर्मू यांनी भारतातर्फे जी 20तील देशांना निमंत्रण पत्र पाठवले आहे. यात त्यांच्या कार्यालयाने प्रेसिडेंट ऑफ इंडिया असं न लिहिता प्रेसिडेंट ऑफ भारत अस लिहिलं आहे. याचबरोबर एका सरकारी बुकलेटमध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव भारत के प्रधानमंत्री असं लिहिण्यात आला आहे. स्वतः भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असलेले संबीत पात्रा यांनी हे ट्वीट केले आहे.

Anurag Thakur China-Congress Link
PM Modi ISRO Visit : मोदीजी, शास्त्रज्ञांची भेट ठीक, पण रोड शो गरज काय होती? वडेट्टीवारांचा इस्त्रो भेटीवरून सवाल

यामुळे इंडिया हे नाव हटवण्यात येणार का? त्या जागी भारत हाच शब्दप्रयोग करण्यात येणार का? असा प्रश्न कित्येक नागरिकांना पडला आहे.

अशातच केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या विषयी महत्वाचे भाष्य केले आहे. यावेळी ते म्हणाले की, देशाचे नाव बदलण्याचा विषयच येत नाही. या केवळ अफवा आहेत. मला एवढंच वाटतं की, ज्याला भारत या शब्दाला विरोध आहे. त्यांची मानसिकता नक्की काय आहे? हे समोर येत आहे. जर राष्ट्रपतींनी प्रेसिडेंट ऑफ भारत असं लिहिलं आहे तर त्यात चूक काय?

Anurag Thakur China-Congress Link
PM Narendra Modi: 100 व्या स्वातंत्र्यदिनी भारत एक विकसित देश; मोदींच्या मुलाखतीतील 10 महत्त्वाचे मुद्दे

जी 20 चा जेव्हा ब्रॅण्डिंग लोगो समोर येईल तेव्हा त्यामध्ये इंडिया आणि भारत दोन्ही असेल. मी भारत सरकारचा मंत्री आहे. यात नवीन काही नाही. मात्र भारत शब्दाला आक्षेप का बरं? भारत या शब्दापासून कोणालाही आक्षेप कसा होऊ शकतो? भारत या शब्दाला विरोध करणं म्हणजे संबंधित व्यक्ती ही भारताच्या विरोधात आहे. इंडियाच्या विरोधात आहे. हे लोक बाहेर देशात जाऊन भारताची निंदा करतात आणि जेव्हा भारतात असतात तेव्हा भारत शब्द त्यांना नको असतो. त्यांना भारतीय शब्दावर आक्षेप वाटतो.

Anurag Thakur China-Congress Link
PM Modi: जूनमध्येच ठरला होता 'एक देश एक निवडणूक'चा आराखडा; अध्यक्ष म्हणून कोविंद यांचीच निवड का?
Anurag Thakur China-Congress Link
Shivsena Vs Modi : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कुलभूषण जाधवांना भारतात आणणार का? उद्धव ठाकरेंचा मोदींना खोचक प्रश्न

तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपतींच्या या भूमिकेचा कौतुक केलं आहे. देशासाठी हिंदी नावाचा वापर देशाचा संस्कृती दर्शवतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.