नवी दिल्ली : भारताला पुढील 20 वर्षांमध्ये 2,210 नवीन विमानांची आवश्यकता असेल, असा अंदाज एअरबस इंडिया मार्केटने नुकताच वर्तवला आहे. या ताफ्यात 1,770 नवीन लहान आणि 440 मध्यम आणि मोठी विमाने (Flight) असू शकतात, असे देखील नमुद करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षात भारताने हवाई वाहतुकीच्या वाढीचा कल पाहिला असून देशांतर्गत वाहतूक जवळपास तिपटीने वाढली आहे आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक दुप्पट झाली आहे. (Airbus ’ latest India Market Forecast)
पुढील काही दशकात, भारताची लोकसंख्या (Indian Population) जगातील सर्वात मोठी असेल, त्याबरोबरच देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) G20 राष्ट्रांमध्ये सर्वात वेगाने वाढेल. त्यामुळे मध्यमवर्ग हवाई प्रवासावर अधिक खर्च करेल असे सांगण्यात आले आहे. परिणामी, भारतातील प्रवासी वाहतूक 2040 पर्यंत वार्षिक 6.2% दराने वाढेल, जी प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान असेल आणि जागतिक सरासरी 3.9% पेक्षा जास्त असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
“फ्लॅगशिप A320 विमानाने भारताची देशांतर्गत बाजारपेठ मोठ्याप्रमाणात विकसित होत आहे. त्यापार्श्वभूमीवर भारतातील आणि भारताबाहेरील आंतरराष्ट्रीय प्रवासाची क्षमता अनलॉक करण्याची वेळ आली आहे, असे मत एअरबस इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष आणि एमडी रेमी मेलर्ड यांनी व्यक्त केले आहे. वाढत्या विमान उद्योगातील सेवेसाठी, भारताला 2040 पर्यंत अतिरिक्त 34,000 पायलट आणि 45,000 तंत्रज्ञांची आवश्यकता असेल असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.