BSP Mayawati: कोणाला पाठिंबा, INDIA की NDA? मायावती स्पष्ट करणार भूमिका; उद्या बोलावली पक्षाची बैठक

लोकसभा निवडणुकीचे वारे आता देशात वाहायला लागले आहेत.
Mayawati BSP
Mayawati BSP
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे वारे आता वाहायला लागले आहेत. त्यामुळंचं आत्तापर्यंत कुठेही चर्चेत नसलेल्या उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी पक्षाची बैठक बोलावल्यानं चर्चेत आल्या आहेत. (INDIA or NDA BSP Mayawati will explain the role to support alliance called Party Meeting tomorrow)

मायावतींच्या भूमिकेकडं सर्वांच्या नजरा

लोकसभा निवडणुकीसाठी देशात सध्या भाजपप्रणित एनडीए आणि भाजपविरोधी इंडिया आघाडीत थेट लढत होणार आहे. पण या दोन्ही युतींपैकी एकातही अद्याप मायावतींचा समावेश झालेला नाही. पण त्या ज्या बाजूला समर्थन जाहीर करतील त्याची ताकद वाढणार आहे. त्यामुळेच मायावती यांच्या भूमिकेकडं सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. (Latest Marathi News)

Mayawati BSP
Chandrayaan 3 : चांद्रयान-3 च्या लँडिंग सोहळ्यासाठी देशभरात उत्साह; इस्लामिक सेंटरमध्ये मुलांचं नमाज पठण

बैठकीचा काय असेल अजेंडा?

दरम्यान, उद्या, २३ ऑगस्ट रोजी मायावती यांनी बहुजन समाज पार्टीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा स्वतंत्रपणे लढायचं हे ठरवलं जाणार आहे. त्याचबरोबर जागावाटप, पक्षाचा जाहीरनामा आणि निवडणूक रणनीती याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. (Marathi Tajya Batmya)

Mayawati BSP
Chandrayaan 3 Live Streaming : लाईव्ह पाहता येणार 'चांद्रयान-3'ची लँडिंग; मोबाईलवर मिळेल नोटिफिकेशन! जाणून घ्या कसं?

उद्या दोन महत्वाच्या गोष्टी घडणार

उद्या भारताची महत्वाकांक्षी अंतराळ मोहिम असलेल्या चांद्रयान ३ चं चंद्रावर लँडिंग होणार आहे. त्यामुळं संपूर्ण देश हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवणार आहे. तर दुसरीकडं मायावतींनी बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीमुळं देशाच्या राजकारणातही महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.