भारत आमचं दुसरं घर! काश्मीरवरील वादग्रस्त ट्वीटनंतर Hyundaiने पाक डिलरला झापलं

दक्षिण कोरियाची प्रसिद्ध कार निर्माता कंपनी ह्युंदाईने (Hyundai) भारत आपले दुसरं घर असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
Hyundai Statement after boycott Hyundai trend on twitter
Hyundai Statement after boycott Hyundai trend on twitter Esakal
Updated on

दक्षिण कोरियाची प्रसिद्ध कार निर्माता कंपनी ह्युंदाईने (Hyudai) भारत आपले दुसरं घर असल्याचा पुनरुच्चार केला आहे. भारतीय राष्ट्रवादाचा आदर करण्याच्या आपल्या विचारावर ह्युंदाई ठाम आहे, असंही कंपनीने म्हटले आहे. पाकिस्तानमधील (Pakinstan) ह्युंदाईच्या एका डिलरने काश्मीरमधील फुटीरतावाद्यांचे समर्थन करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या पोस्टनंतर भारतात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि ट्विटरवर (Twitter) ह्युंदाईचा बहिष्कार (#BoycottHyundai) मोहीम ट्रेंडींगमध्ये येऊ लागली. ('India our second home', Hyundai Motors' response to Pakistani dealer's Kashmir tweet)

Hyundai Statement after boycott Hyundai trend on twitter
'काश्मीर पाकिस्तानचा' म्हणणारं वादग्रस्त ट्विट; #BoycottHyundai ट्रेंड चर्चेत

पाकिस्तानमधील ह्युंदाई डिलरने @hyundaiPakistanOfficial या ट्विटर अकाउंटवर काश्मीर एकता दिनाच्या समर्थनार्थ एक संदेश पोस्ट केला. या पोस्टमध्ये त्याने 'काश्मीर एकता दिवसाला स्वातंत्र्यासाठी संघर्ष असं म्हटलं होतं. या पोस्टनंतर भारतात ट्विटरवर #BoycottHyundai ट्रेंडिंगमध्ये आले होते. ह्युंदाईची उत्पादने खरेदी करा, अशा पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) शेअर होऊ लागले. याची दखल ह्युंदाईने घेतली असून या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय बाजारपेठेशी आपण कटीबद्ध असल्याचं Hyundai Motors India ने सोशल मीडियावर एक संदेश पोस्ट करून म्हटले आहे. "ह्युंदाई मोटर इंडिया गेल्या 25 वर्षांहून अधिक काळापासून भारतीय बाजारपेठेसाठी वचनबद्ध आहे, आम्ही राष्ट्रवादाचा आदर करण्याच्या आमच्या दृढ नीतिमत्तेशी ठाम आहोत," असं कंपनीने म्हटले आहे. भारत हे Hyundai ब्रँडचे दुसरे घर असल्याचं कंपनीने म्हटले आहे.

Hyundai Statement after boycott Hyundai trend on twitter
पाकव्याप्त काश्मीर २०२४ पर्यंत भारतामध्ये येईल

असंवेदनशील विचारांप्रति आमचं शून्य सहनशीलतेचे धोरण आहे. आम्ही अशा विचारांचा तीव्र निषेध करतो. भारताशी असलेल्या आमच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, आम्ही देशाच्या तसेच तेथील नागरिकांच्या भल्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेवू, असं ह्युंदाई मोटर इंडियानं म्हटले आहे. मारुती सुझुकी आणि टाटानंतर ह्युंदाई मोटर इंडिया ही देशातील तिसरी सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे. कंपनीच्या क्रेटा आणि व्हेन्यूसह विविध मॉडेल्स भारतीय बाजारात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.