PM Modi Oath Ceremony : 'या' दोन दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवणं अशक्य; अखेर शपथविधीसाठी आला फोन

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांना मंत्रिपदाची पुन्हा संधी मिळणार नाही, अशी चर्चा होती. मोदी-शाह यांच्याशी त्यांचं नसलेलं सख्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे हे दोन नेते मंत्रिपदापासून दूर राहतील असं सांगितलं जात होतं.
JP Nadda, Narendra Modi and Amit Shaha
JP Nadda, Narendra Modi and Amit ShahaSakal
Updated on

NDA Oath Ceremony : नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून रविवारी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. यावेळी भाजपला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी एनडीएमधल्या घटकपक्षांमुळे भाजप पुन्हा सत्तेवर बसणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या तिसऱ्या सरकारमध्ये त्यांना एनडीएमधील घटकपक्षांना चांगल्या जागा देऊन संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे कुणाला किती जागा मिळणार? याबद्दल रविवारी संध्याकाळी स्पष्टता येईल.

JP Nadda, Narendra Modi and Amit Shaha
Modi Government: शपथविधीपूर्वी अमित शाह यांच्या घरी रात्री उशिरा खलबतं, कॅबिनेट मंत्र्यांच्या नावांवर चर्चा?

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांना मंत्रिपदाची पुन्हा संधी मिळणार नाही, अशी चर्चा होती. मोदी-शाह यांच्याशी त्यांचं नसलेलं सख्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे हे दोन नेते मंत्रिपदापासून दूर राहतील असं सांगितलं जात होतं.

JP Nadda, Narendra Modi and Amit Shaha
Ind vs Pak : पाकिस्तानवर टांगती तलवार... आज स्पर्धेतून होणार बाहेर? नाणेफेक महत्त्वाची पण भारताचं पारडं जड

परंतु राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोन नेत्यांना भाजपकडून कोणती खाती मिळतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. 'साम टीव्ही'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

NDA- 17

BJP - 09

Shivsena (Eknath Shinde) - 07

NCP (Ajit Pawar) - 01

INDIA- 30

Congress- 13

Shivsena (Uddhav Thackeray) - 09

NCP (Sharad Pawar)- 08

Independent- 01 (congress)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.