लोकसंख्या वाढीत भारत लवकरच अव्वलस्थानी! चीनला टाकणार मागे - UN Report

Indian population originated in three migration waves: study
Indian population originated in three migration waves: study
Updated on

नवी दिल्ली - आज जागतिक लोकसंख्या दिन आहे. 2011 साली जगाची लोकसंख्या 7 अब्ज होती. तर २०२१ मध्ये जगाची लोकसंख्या ७.८ अब्ज होती. 2031 मध्ये जगाची लोकसंख्या 8.6 अब्ज होईल असा अंदाज आहे. गेल्या दशकात जगाची लोकसंख्येत १.१ टक्के दराने वाढत झाली. सध्या जगाची लोकसंख्या दरवर्षी ०.९ टक्के या वेगाने वाढत आहे. (Worlds Population news in marathi)

Indian population originated in three migration waves: study
विजय मल्ल्याला SC चा दणका, 4 महिन्याचा तुरुंगवास, २ हजाराचा दंड

दरम्यान भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक देश होण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटलं आहे.

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या डेटावरून असे दिसून येते की आफ्रिकेतील लोकसंख्या सर्वाधिक 2.5 टक्के दराने वाढत आहे. दुसरीकडे भारताची लोकसंख्या १४०.६६ कोटींवर पोहोचली आहे. लोकसंख्या दरवर्षी ०.९% या दराने वाढत आहे. भारताने अनेक बाबींमध्ये बरीच प्रगती केली आहे. मात्र काही बाबींवर भारताची कामगिरी खराब आहे. भारतात अद्याप बालविवाह पूर्णपणे बंद झालेले नसून 27 टक्के मुलींची लग्नं 18 वर्षांच्या आधी होतात.

2050 मध्ये अन्नाची गरज भागवणे होणार कठीण

2050 सालातील सर्वात मोठे आव्हान लोकांना अन्न पुरवण्याचे असेल, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. तोपर्यंत जगाची लोकसंख्या 9 अब्ज होईल. तेव्हा एवढ्या मोठ्या लोकसंख्येला निरोगी ठेवण्यासाठी पोषक आहार देण्याचे मोठे आव्हान असेल. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची अन्नाची गरज भाविण्यासाठी विकसित देशांचे कृषी उत्पादन 60 टक्क्यांनी आणि विकसनशील देशांना त्यांचे कृषी उत्पादन दुप्पट करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.