मुंबई- कोरोना महामारी संपल्यापासून पुन्हा पर्यटन क्षेत्राने जोर धरला आहे. विशेषत: भारतातून साऊथ आफ्रिकेला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. २०२३ मध्ये साऊथ आफ्रिकेला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या ४३ टक्क्यानी वाढलीये. मुंबई येथे १६ फेब्रुवारी रोजी साऊथ आफ्रिका वार्षिक इंडिया रोडशोचे समापन झाले. यावेळी याची माहिती देण्यात आली.
साऊथ आफ्रिकेसाठी भारत हा देश महत्त्वाचा आहे. साऊथ आफ्रिकेच्या पर्यटन क्षेत्रामध्ये भारत टॉप-३ फोकस बाजारपेठांमध्ये सामील आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिका टुरिझम विभागाकडून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारतात अनेक कार्यक्रम राबवण्यात आले. साऊथ आफ्रिकन टूरिझमच्या मध्यपूर्व, भारत व आग्नेय आशियामधील उपप्रमुख कुमारी निलिस्वा निकानी यांच्या नेतृत्वांतर्गत हे कार्यक्रम राबवण्यात आले.
मुंबईत शहरातून साऊथ आफ्रिकेत पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. एकट्या मुंबईत पर्यटकांची संख्या २०२३ मध्ये २३ टक्क्यांनी वाढलीये.विशेषत: अॅडव्हेंचर अॅक्टिविटीकडे पर्यटकांचा कल आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध देखील वाढत आहेत. येत्या काळात साऊथ आफ्रिकेला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची आशा व्यक्त केली जाते. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.