Manoj Pande : चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांचं मोठं विधान; म्हणाले...
नवी दिल्ली - प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत-चीन सीमेवर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारत सज्ज आहे, असं लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आज सांगितले.
जनरल मनोज पांडे म्हणाले की, लष्कराने गेल्या वर्षी सीमेवर निर्माण झालेल्या तणावानंतर सीमेची सुरक्षा सुनिश्चित केली. आम्ही भविष्यातील युद्धासाठीची तयारी पूर्ण केली आहे. यावेळी पांडे यांनी पाकिस्तानचा उल्लेख करत म्हटलं की, पश्चिमेकडील सीमेवरील संघर्षविरामाच्या उल्लंघनात घट झाली आहे. मात्र त्याचवेळी अतिरेकी आपला जम बसविण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सिद्ध करण्यासाठी अनेक अतिरेकी संघटना प्रयत्न करत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
१९४९ नंतर प्रथमच परंपरा खंडित
अतिरेक्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी इतर सुरक्षा दलांसह लष्करही कटिबद्ध आहे. जम्मू-काश्मीरच्या जनतेने हिंसाचार नाकारला असून सकारात्मक बदलांचे स्वागत करत असल्याचे ते म्हणाले. १९४९ नंतर प्रथमच परंपरा मोडीत काढत आज सकाळी दिल्लीऐवजी बेंगळुरू येथे लष्कर दिनाची परेड पार पडली. दुपारी शहरातील आर्मी सर्व्हिस कॉर्प्स (एएससी) सेंटर अँड कॉलेजमध्ये दुसरा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.