नवी दिल्ली : भारताचे शेजारील राष्ट्र चीनसोबतचे संबंध ठीक नाहीत, असा खुलासा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं केला आहे. यामुळं सीमावादावरुन अद्यापही चीन-भारत संबंध ताणलेले आहेत यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. खुद्द परराष्ट्र मंत्रालयानं ही जाहीर कबुली दिल्यानं याचे राजकीय पडसाद काय उमटतात हे पहावं लागेल. (India relationship with China not normal says MEA spokesperson Randhir Jaiswal)
चीनसोबतचे संबंध सामान्य नाहीत - जैस्वाल
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले, "चीनबद्दलची आपली भूमिका सर्वज्ञात आहे. चीनसोबतचं भारताचं नातं असं आहे जे सामान्य नाही पण आमच्यात लष्करी आणि राजनयिक दोन्ही बाजूंनी संवाद सुरु आहे. (Latest Marathi News)
तीन वर्षांपासून संघर्ष सुरु
गेल्या साडेतीन वर्षांपासून पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु आहे. भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांनी आपलं सैन्य या परिसरात तैनात केलेलं आहे. इतकंच नव्हे तर राजनैतिक आणि सैन्य संवादामार्फत दोन्ही बाजूंकडून अनेक भागात तोडगा काढला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.