India Population Report : भारतात हिंदूंची संख्या घटली, 65 वर्षांत मुस्लिमांची संख्या 'एवढी' वाढली; जाणून घ्या प्रत्येक धर्माची लोकसंख्या

१९५० मध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ९.८४ टक्के इतकी होती. आता हीच टक्केवारी १४.९ पर्यंत जावून पोहोचली आहे. तर ईसाई धर्माच्या लोकांची संख्या २.२४ टक्क्यांवरुन २.३६ टक्के इतकी झाली आहे. याप्रमाणेच शीख धर्मियांची लोकसंख्या १.२४ टक्क्यांवरुन १.८५ टक्के झाली आहे.
India Population Report : भारतात हिंदूंची संख्या घटली, 65 वर्षांत मुस्लिमांची संख्या 'एवढी' वाढली; जाणून घ्या प्रत्येक धर्माची लोकसंख्या
Updated on

India Hindu Population : देशामध्ये मागच्या ६५ वर्षात हिंदुंची लोकसंख्या ८ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर याच काळात मुस्लिमांची लोकसंख्या मात्र ९.८४ टक्क्यांवरुन १४.९ टक्क्यांपर्यंत गेली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या रिपोर्टमधून ही माहिती पुढे आलीय. यामध्ये पारशी आणि जैन समूहाला सोडून देशातल्या सर्व धार्मिक अल्पसंख्यकांची लोकसंख्या एकूण ६.५८ टक्के वाढली आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५० ते २०१५ यामध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे. बहुसंख्यक असलेल्या हिंदूंची लोकसंख्या ७.८२ टक्क्यांनी घटली आहे. तर मुस्लिमांची लोकसंख्या ओव्हरऑल ४३.१५ टक्क्यांनी वाढली आहे.

१९५० मध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ९.८४ टक्के इतकी होती. आता हीच टक्केवारी १४.९ पर्यंत जावून पोहोचली आहे. तर ईसाई धर्माच्या लोकांची संख्या २.२४ टक्क्यांवरुन २.३६ टक्के इतकी झाली आहे. याप्रमाणेच शीख धर्मियांची लोकसंख्या १.२४ टक्क्यांवरुन १.८५ टक्के झाली आहे.

६५ वर्षात कोणत्या धर्माची लोकसंख्या वाढली-घटली?

रिपोर्टमधील आकडेवारीनुसार १९५० मध्ये भारतात हिंदू लोकसंख्या ८४.६८ टक्के इतकी होती. या टक्केवारी आता घट झाली असून २०१५ मध्ये ७८.६ टक्के हिंदूंची लोकसंख्या झाली आहे. याचवेळी मुस्लिम लोकसंख्या ९.८४ वरुन १५.९ टक्के झाली आहे.

स्वातंत्र्याच्या तीन वर्षांनंतर ईसाई समाजाची देशातील लोकसंख्या २.२४ टक्के होती ती २०१५ मद्ये २.३६ टक्के झाली आहे. १९५० मध्ये शीख लोकसंख्या १.२४ टक्के होती, यात वाढ होऊन २०१५ मध्ये १.८५ टक्के झाली आहे.

India Population Report : भारतात हिंदूंची संख्या घटली, 65 वर्षांत मुस्लिमांची संख्या 'एवढी' वाढली; जाणून घ्या प्रत्येक धर्माची लोकसंख्या
Gujrat Video: 'माझ्या बापाची EVM आहे'; भाजप नेत्याचा मुलाने मतदान केंद्रातूनच केलं इन्स्टाग्राम लाईव्ह

तर बौध्द धर्मियांची संख्यादेखील वाढली आहे. १९५० मध्ये बौद्धांची लोकसंख्या ०.०५ टक्के होती आता २०१५ मध्ये ०.८१ टक्के अशी वाढ झाली आहे. जैन समाजाची लोकसंख्या ०.४५ टक्के इतकी होती आता त्यामध्ये घट होऊन २०१५ मध्ये ०.३६ टक्के इतकी झाली आहे. यासोबत पारशी लोकसंख्या ०.०३ टक्क्यांवरुन घसरुन ०.००४ टक्के इतकी झाली आहे.

धार्मिक लोकसंख्येवर कोणाचा रिपोर्ट?

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (ईसी-पीएम) आपल्या रिपोर्टमधून धार्मिक लोकसंख्येची माहिती दिली आहे. ईसी-पीएमचे सदस्य शमिका रवी, ईसी-पीएमचे कन्सल्टंट अपूर्व कुमार मिश्रा आणि ईसी-पीएमचे प्रोफेशनल अब्राहम जोस यांनी हा रिपोर्ट तयार केला आहे. देशात सामाजिक विविधता वाढण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.